BECIL Jobs 2022 : बेसिलमध्ये बंपर भरती, दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी संधी, झटपट अर्ज करा
BECIL Recruitment 2022 : BECIL मध्ये मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी उमेदवार 14 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात.
BECIL Recruitment 2022 : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) नं भरती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, बेसिलमध्ये दहावी ते पदवीधर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवार 14 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार BECIL ची अधिकृत वेबसाइट becil.com वर जाऊन अर्ज करू शकतात.
रिक्त जागांचा तपशील
एकूण : 19 पदं
- मल्टी टास्किंग स्टाफ : 3 पदं
- वरिष्ठ सल्लागार (प्रकल्प) : 3 पदं
- वरिष्ठ सल्लागार/सल्लागार (एव्हिएशन) : 3 पदं
- सल्लागार/सल्लागार (MIS) : 2 पदं
- सल्लागार (वित्त) : 2 पदं
- कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक : 2 पदं
- डेटा एंट्री ऑपरेटर : 2 पदं
- सल्लागार : 1 पद
- सल्लागार (अभियांत्रिकी) : 1 पद
वयोमर्यादा
भरतीसंदर्भातील अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि मल्टी टास्किंग स्टाफसाठी उमेदवारांचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावं. त्याच वेळी, इतर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय 70 वर्ष निश्चित करण्यात आलं आहे.
अर्ज शुल्क
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य / OBC / माजी सैनिक / महिला श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 750 रुपये भरावे लागतील. तसेच, SC/ST/EWS/PH श्रेणीतील उमेदवारांना 450 रुपये अर्ज शुल्क भरावं लागणार आहे.
वेतन
निवड झालेल्या उमेदवारांना 20 हजार रुपये ते 2,00,00 रुपये पगार दिला जाईल. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.
कसा कराल अर्ज?
- सर्व प्रथम BECIL ची अधिकृत वेबसाइट becilregistration.com ला भेट द्या.
- आता New Registration वर क्लिक करा.
- त्यानंतर नोंदणी करा.
- आता उमेदवारांना आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
- त्यानंतर अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
- उमेदवार पुढील संदर्भासाठी हार्डकॉपी सोबत ठेवू शकतात.
- त्यासाठी भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढा.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.