Air India Recruitment 2022 : Air India Airport Service Limited ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 277 पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीनं केली जाते. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2022 आहे. या भरतीसाठी अर्ज इमेलद्वारे करावा लागणार आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी, तुम्ही www.aiasl.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण तपशील वाचू शकता. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत वेबसाइट www.aiasl.in वर जाऊन प्रथम संपूर्ण तपशील वाचला पाहिजे. या अर्ज प्रक्रियेअंतर्गत, पदांनुसार उमेदवारांची पात्रता वेगळ्या पद्धतीनं मागविण्यात आली आहे.


पदांची संख्या : 277


रिक्त जागांचा तपशील



  • मदतनीस : 177

  • रॅम्प सर्व्हिस एजंट : 24

  • कस्टमर एजंट : 39

  • ज्युनियर एक्झिक्युटिव्ह Pax : 8

  • ज्युनियर एक्झिक्युटिव्ह टेक : 2

  • फायनन्स ऑफिसर : 05

  • अॅडमिन ऑफिसर : 04

  • डेप्युटी ऑफिसर रॅम्प : 03

  • डेप्युटी टर्मिनल मॅनेजर : 01 


पात्रता


डेप्युटी टर्मिनल मॅनेजर : 18 वर्षांचा अनुभव असलेले पदवीधर
डेप्युटी ऑफिसर रॅम्प : 12 वर्षांचा अनुभव असलेले पदवीधर
युटिलिटी कम रॅम्प ड्रायव्हर : जड मोटार वाहन चालवण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह टेक्निकल : मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग यापैकी कोणत्याही एकामध्ये बॅचलर पदवी
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह : 9 वर्षांच्या अनुभवासह पदवीधर
कस्टमर एजंट : वरिष्ठ ग्राहक पदांसाठी ITA मध्ये डिप्लोमासह पदवी. तर कनिष्ठ ग्राहक एजंट पदासाठी 12वी पास आणि एक वर्षाचा अनुभव
रॅम्प सर्व्हिस एजंट : मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा
ऑफिसर अॅडमिन :  एचआर किंवा पर्सनल मॅनेजमेंटमधील स्पेशलायझेशनसह एमबीए
ऑफिसर फायनान्स : इंटर चार्टर्ड अकाउंटंट किंवा एमबीए फायनान्स 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha