ESIC Jobs 2022 : ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळानं सामाजिक सुरक्षा अधिकारी पदासाठी अर्ज मागवले आहेत. सर्व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार 12 एप्रिलपर्यंत अधिकृत वेबसाइट esic.nic.in वर जाऊन या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांच्या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 12 मार्चपासून सुरू झाली आहे. 


अधिकृत अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, सोशल सिक्युरिटी ऑफिसर (सामाजिक सुरक्षा अधिकारी) पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचं वय 21 ते 27 वर्ष निश्‍चित करण्यात आलं आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार, उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतून पदवीधर असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त विद्यापीठ पदवी असणं आवश्यक आहे. 


सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. या भरती प्रक्रियेद्वारे सामाजिक सुरक्षा अधिकारी पदाच्या 93 पदांची भरती करण्यात येणार आहे. ज्यामध्ये अनारक्षित प्रवर्गासाठी 43 पदं, एससी प्रवर्गासाठी 9 पदं, एसटी प्रवर्गासाठी 8 पदं, ओबीसीसाठी 24 पदं आणि आर्थिक 9 पदं दुर्बल घटकांसाठी निश्चित करण्यात आली आहेत.


या भरती अंतर्गत निर्धारित करण्यात आलेल्या पदांसाठी उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, संगणक कौशल्य चाचणी आणि वर्णनात्मक चाचणीच्या आधारे करण्यात येणार आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात. पे मॅट्रिक्स लेव्हल 7 नुसार, या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 44900 ते 142400 प्रति महिना प्रदान केले जातील. इच्छुक उमेदवार esic.nic.in या अधिकृत वेबसाइटवर 12 एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha