Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


बँक ऑफ बडोदा आणि स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट बँक ऑफ इंडियामध्ये (SIDBI) विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सर्व माहिती खालीलप्रमाणे, 


बँक ऑफ बडोदा


विविध पदांच्या 105 जागांसाठी भरती निघाली आहे.


पहिली पोस्ट – मॅनेजर (फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट)


एकूण जागा – 15


शैक्षणिक पात्रता - B.E./ B.Tech in कॉम्प्युटर सायन्स/ IT/डेटा सायन्स किंवा /कॉम्प्युटर सायन्स/IT पदवी/ B.Sc/ BCA/ MCA, 3 वर्षांचा अनुभव


वयोमर्यादा – 24 ते 34 वर्ष


 दुसरी पोस्ट – क्रेडिट ऑफिसर


एकूण जागा – 40 (या पोस्टसाठी 2 ग्रेड आहेत. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळेल.)


शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, 8 वर्षांचा अनुभव किंवा CA / CMA / CFA आणि 7 वर्षांचा अनुभव


वयोमर्यादा – 25 ते 40 वर्ष


 तिसरी पोस्ट -  क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस


एकूण जागा – 20 (या पोस्टसाठी 2 ग्रेड आहेत. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)


शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी आणि 8 वर्षांचा अनुभव किंवा CA / CMA / CFA आणि 7 वर्षांचा अनुभव


वयोमर्यादा – 25 ते 40 वर्ष


 चौथी पोस्ट - फॉरेक्स – ऍक्विजिशन अँड रिलेशनशिप मॅनेजर


एकूण जागा – 30


शैणक्षिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी आणि मार्केटिंग/सेल्समध्ये PG पदवी/डिप्लोमा, 5 वर्षांचा अनुभव


वयोमर्यादा – 24 ते 40 वर्ष


संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 मार्च 2022


अधिकृत वेबसाईट - www.bankofbaroda.in  (या वेबसाईटवर गेल्यावर about us मध्ये careers वर क्लिक करा. Current opportunities मध्ये know more वर क्लिक करा. त्यात तुम्हाला recruitment of specialist officers in bank of baroda या प्रोफाईलमध्ये विस्ताराने माहिती मिळेल.)


 
SIDBI (small industries development bank of india)


पोस्ट – सहाय्यक व्यवस्थापक


एकूण जागा – 100


शैक्षणिक पात्रता – पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी


वयोमर्यादा – 18 ते 28 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2022


अधिकृत वेबसाईट -  www.sidbi.in  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. SIDBI invites Applications for Recruitment of Officers in Grade ‘A’– General Stream यावर क्लिक करा. SIDBI Officers general stream English pdf फाईलवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


संबंधित बातम्या: