Indian Navy Jobs 2022 : जर तुमच्यात देशसेवेची भावना असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय नौदलात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी इंडियन नेव्हीकडून ट्रेड्समनच्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत 1531 पदांची नियुक्ती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.


भरतीच्या एकूण पदांची संख्या 



  • अनारक्षित श्रेणी : 697 पदं

  • EWS श्रेणी : 141 पदं

  • OBC प्रवर्ग : 385 पदं

  • SC श्रेणी : 215 पदं

  • ST श्रेणी : 93 पदं


वेतन 


आम्ही तुम्हाला सांगतो की, ट्रेडसमनच्या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल 2 अंतर्गत 19,900 ते 63,299 रुपये प्रति महिना वेतन दिलं जाणार आहे. या भरतीअंतर्गत 22 मार्चपासून या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी 22 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात.


आवश्यक वयोमर्यादा


भारतीय नौदलातील व्यापारी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावं आणि राखीव श्रेणीतील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार, उच्च वयोमर्यादेत विशेष सवलत दिली जाईल.


शैक्षणिक पात्रता 


भारतीय नौसेनेत भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण झालेला असावा. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. यासोबतच त्यांच्याकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) प्रमाणपत्र असणेही आवश्यक आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha