NMDC Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. NMDC लिमिटेडने एग्जीक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचंही आवाहनही केलं आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च असणार आहे. त्यामुळे अधिसूचनेतील नियमांनुसार, पात्र उमेदवार एनएमडीसीची अधिकृत वेबसाईट www.nmdc.co.in वर जाऊन अर्ज करु शकतात. एनएमडीसीनं एकूण 29 पदांसाठी भरती जारी केली आहे. 

Continues below advertisement


शैक्षणिक पात्रता 


इच्छुक उमेदवारांसाठी काही शैक्षणिक पात्रतेच्या (Educational Qualification) अटी घालण्यात आल्या आहेत. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी आणि पीजी पदवी किंवा पीजी डिप्लोमा किंवा एमबीए असावी. या पदासाठी निवड प्रक्रिया UGC-NET डिसेंबर 2022 आणि जून 2022 क्वाल स्कोअर, GD च्या आधारे केली जाईल.


वेतन 


या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन 50,000 रुपयांपासून ते 1,80,000 रुपयांपर्यंत देण्यात येईल. 


अर्ज फी


या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC/ST/PWD/माजी सैनिक श्रेणीतील उमेदवार आणि इतरांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट दिली जाईल.


रिक्त पदांची संख्या 


नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएमडीसी) च्या या भरती अभियानमध्ये एकूण 29 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. ज्यामध्ये 13 पदं अनारक्षित वर्गासाठी, 6 ओबीसी आणि 4 एससी आणि 2 एससी वर्गासाठी आहेत. 


अर्ज कसा कराल? 


इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट www.nmdc.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. त्यानंतर करिअरचा पर्याय निवडावा लागतो. मग त्यांनी कार्यकारी प्रशिक्षणार्थी नोकरीच्या रिक्त जागांसाठी अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांना क्लिक करणं आवश्यक आहे. उमेदवारांनी माहिती तपासल्यानंतरच ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय निवडावा. अर्ज काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रं अपलोड करा. अर्ज फी भरा आणि ऑनलाइन फॉर्म भरा. तुमच्या गरजेनुसार डॉक्युमेंट डाउनलोड करा आणि प्रिंट करा.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha