LIVE : पणजी, वाळपई पोटनिवडणूक : मतमोजणी सुरु
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
01 Jan 1970 05:30 AM
पणजीतून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचा विजय, 4 हजार 800 मतांनी काँग्रेसच्या गिरीश चोडणकरांचा पराभव
पणजीतून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर 2 हजार मतांनी आघाडीवर
वाळपईतून भाजपचे विश्वजित राणे सुमारे 4 हजार मतांनी आघाडीवर
पणजीतून भाजपतर्फे मनोहर पर्रीकर आणि काँग्रेसतर्फे राष्ट्रीय सरचिटणीस गिरीश चोडणकर रिंगणात आहेत. याशिवाय गोवा सुरक्षा मंचचे आनंद शिरोडकर व अपक्ष उमेदवार केनेथ सिल्वेरा हेदेखील निवडणूक रिंगणात असल्याने सार्यांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.
वाळपईतून भाजपतर्फे विश्वजीत राणे व काँग्रेसचे रॉय नाईक व अपक्ष उमेदवार रोहिदास गावकर निवडणूक रिंगणात आहेत.
पणजी व वाळपई पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी तीन फेर्यांमध्ये होणार असून यासाठी प्रत्येकी 14 टेबल मांडले आहेत. मतमोजणीच्या कामासाठी 100 कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे.
पणजी, वाळपई पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पणजीच्या जुने गोमेकॉ इमारतीत ही मतमोजणी सुरु झाली असून, पहिल्या मजल्यावर वाळपई आणि तळमजल्यावर पणजी पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे.
पार्श्वभूमी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -