एक्स्प्लोर
LIVE - राष्ट्रपती निवडणूक: भुजबळ, कदम मतदानासाठी जेलबाहेर
नवी दिल्ली/मुंबई: देशाच्या 14 व्या राष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मतदान केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मतदान केलं. राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात थेट लढत आहे. मात्र पाठिंब्याचा विचार केला तर सध्या तरी कोविंद यांचं पारडं जड मानलं जात आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुंबईतही आमदारांचं मतदान होत आहे. विशेष म्हणजे जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदमही यांनाही मतदानाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं हे दोघेही मतदान करतील.
LIVE
Background
नवी दिल्ली/मुंबई: देशाच्या 14 व्या राष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मतदान केलं.
भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मतदान केलं.
राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात थेट लढत आहे. मात्र पाठिंब्याचा विचार केला तर सध्या तरी कोविंद यांचं पारडं जड मानलं जात आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुंबईतही आमदारांचं मतदान होत आहे. विशेष म्हणजे जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदमही यांनाही मतदानाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं हे दोघेही मतदान करतील.
13:10 PM (IST) • 17 Jul 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावला
13:07 PM (IST) • 17 Jul 2017
छगन भुजबळ, रमेश कदम तासाभरासाठी जेलबाहेर
जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदम तासाभरासाठी जेलमधून सुटणार आहेत.
13:09 PM (IST) • 17 Jul 2017
11:45 AM (IST) • 17 Jul 2017
राष्ट्रपती निवडणूक : राष्ट्रवादीच्या सर्व खासदार आणि आमदारांचं मीरा कुमार यांना मतदान, प्रफुल्ल पटेल यांची माहिती
12:37 PM (IST) • 17 Jul 2017
जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि रमेश कदम हे राष्ट्रपती निवडणुकीसाठी विधानभवनाकडे रवाना झाले. पोलीस बंदोबस्तात त्यांना मतदानासाठी नेण्यात आलं.
यावेळी राष्ट्रवादीचे अन्य नेतेही उपस्थित होते.
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement