News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

तुमचा 7/12 आजच तपासा, त्रुटी सुधारण्यास मोठी संधी

FOLLOW US: 
Share:
मुंबई: महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर फडणवीस सरकारने महत्त्वाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. सरकारने 7/12 दुरुस्ती आणि चावडी वाचन विशेष मोहीम सुरु केली आहे. यानुसार तुमचा ऑनलाईन सात-बारा उतारा योग्य आहे का हे तपासून पाहा. तुम्ही तुमचा सात/बारा https://mahabhulekh.maharashtra.gov.in/   या वेबसाईटवर पाहू शकाल. जर तुमच्या उताऱ्यात काही त्रुटी असतील तर  1 मे 2017 ते 15 मे 2017 पर्यंत गावातील तलाठ्याशी संपर्क साधा. 15 मे ते 15 जून 2017  यानंतर 15 मे 2017 ते 15 जून 2017 पर्यंत संगणीकृत 7/12 चे चावडी वाचन होईल. यामध्येही काही आक्षेप असल्यास, गाव तलाठीशी संपर्क साधा. 16 जून ते 31 जुलै 2017  संगणकीकृत 7/12 मधील माहितीत प्राप्त आक्षेपांचा विचार करुन आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात येतील.  1 ऑगस्ट 2017 1 ऑगस्टपासून तुम्हाला डिजीटल स्वाक्षरीत 7/12 उपलब्ध होतील. त्यासाठी तुम्हाला चावडीत/ग्राम पंचायतमध्ये किंवा तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नसेल. 712 युद्धपातळीवर ऑनलाईन सात-बाराचं काम  सध्या काही जिल्ह्यात ऑनलाईन सातबारा दिला जात नाही. दफ्तरातील सातबारा आणि संगणकावरील सातबारा यामध्ये थोडी तफावत असल्याने 7/12 नाहीत. त्यामुळेच सार्वत्रिक ऑनलाईन सात-बारा सध्या उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही. ही त्रुटी दूर करण्यासाठीच एडिट मोडूल म्हणजेच सात-बारा दुरुस्तीचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी ऑनलाईन पद्धतीने याच कामात गेल्या नऊ महिन्यांपासून व्यस्त आहेत. आता सर्वच जिल्ह्याची एडिटची सरासरी टक्केवारी 80 %  झाली आहे. 20% राहिलेले काम झाले की सर्व सातबारे ऑनलाईन उपलब्ध होतील. यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता असणार नाही. ऑनलाईन पैसे देऊन किंवा महा ई सेवा केंद्रातून डिजीटल सहीचा वैध कायदेशीर सात - बारा मिळेल. सर्व नागरिक आणि शेतकरी यांना आवाहन करण्यात येत आहे की मोबाईलवर,महा ई सेवा केंद्र, सायबर कॅफे या ठिकाणी महाभूलेख या वेबसाईटवर आपण आपला सातबारा तपासावा. काही त्रुटी असतील तर तातडीने तलाठ्याच्या निदर्शनास आणून द्या, म्हणजे तो सातबारा दुरुस्त करता येईल.
Published at : 03 May 2017 11:33 AM (IST) Tags: 712 Talathi digital maharashtra Digital India

आणखी महत्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: सांगली महापालिका निवडून द्या, कोणताच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही; मुख्यमंत्र्यांचा सांगलीकरांना शब्द

Maharashtra Live Updates: सांगली महापालिका निवडून द्या, कोणताच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही; मुख्यमंत्र्यांचा सांगलीकरांना शब्द

Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला

Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला

Nashik Mahanagarpalika Election 2026: नाशिकमधील बहुचर्चित सुधाकर बडगुजर-मुकेश शहाणे वादाची थेट मुख्यमंत्र्यांकडून दखल; एबी फॉर्मच्या गोंधळाची सखोल चौकशी होणार

Nashik Mahanagarpalika Election 2026: नाशिकमधील बहुचर्चित सुधाकर बडगुजर-मुकेश शहाणे वादाची थेट मुख्यमंत्र्यांकडून दखल; एबी फॉर्मच्या गोंधळाची सखोल चौकशी होणार

मध्यरात्री भयंकर घडलं! दुचाकीस्वाराची अभिनेता अन् त्याच्या पत्नीला धडक, दोघेही रक्तबंबाळ होत रस्त्यावर पडले; हॉटेलसमोरच..

मध्यरात्री भयंकर घडलं! दुचाकीस्वाराची अभिनेता अन् त्याच्या पत्नीला धडक, दोघेही रक्तबंबाळ होत रस्त्यावर पडले; हॉटेलसमोरच..

BMC Election: पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?

BMC Election: पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?

टॉप न्यूज़

Ajit Pawar Pimpri Chinchwad Election 2026: अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले

Ajit Pawar Pimpri Chinchwad Election 2026: अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले

मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'

मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'

Akola Crime News: समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद

Akola Crime News: समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद

Venezuela Bombing: नववर्षाच्या तिसऱ्याच दिवशी आणखी एक युद्ध पेटलं, अमेरिकेनं चार शहरांमध्ये मिसाईलींचा पाऊस पाडला, लष्करी तळांवर, विमानतळांवर बाॅम्ब वर्षाव

Venezuela Bombing: नववर्षाच्या तिसऱ्याच दिवशी आणखी एक युद्ध पेटलं, अमेरिकेनं चार शहरांमध्ये मिसाईलींचा पाऊस पाडला, लष्करी तळांवर, विमानतळांवर बाॅम्ब वर्षाव