News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

गारपीटीनंतर पंचनाम्यासाठी टाळाटाळ, संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको

FOLLOW US: 
Share:
नाशिक : नाशिकच्या सटाणा तालुक्यात काल झालेल्या गारपीटीनंतर आज शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यास महसूल विभागाचे अधिकारी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी नामपूर रस्त्यावर दोन तास रास्तारोको केला. तसंच आमदार दिपीका चव्हाण आणि तहसिलदारांना घेरावही घालण्यात आला. अखेर दिपीका चव्हाण यांनी नुकसान भरपाईचं आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको मागे घेतला गेला. सटाणा तालुक्यातील अनेक गावात काल अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसंच काही भागात गारपीटही झाली. काल दुपारी अंबासन आणि आसखेडा या गावात गारपीट झाली. त्यामुळे अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने डाळिंब, कांदा पिकांचंही नुकसान झालं. सटाणा तालुक्यातील नामपूर परिसराला रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास गारपीट, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपलं. अचानक आलेल्‍या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळी वारा आणि गारपीटीमुळे परिसरातील कांदा, गहू, डाळींब, कांदा बियाणांचं मोठं नुकसान झालं आहे.
Published at : 01 May 2017 07:20 PM (IST) Tags: Hailstorm farmers protest

आणखी महत्वाच्या बातम्या

कुटुंबीयांचा लग्नाला विरोध! प्रेमी युगुलाने उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं

कुटुंबीयांचा लग्नाला विरोध! प्रेमी युगुलाने उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं

पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?

पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीची संपवलं, अपघात वाटावा म्हणून मृतदेह पुलाखाली फेकला, धक्कादायक घटनेनं गडचिरोली हादरलं

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीची संपवलं, अपघात वाटावा म्हणून मृतदेह पुलाखाली फेकला, धक्कादायक घटनेनं गडचिरोली हादरलं

Nashik : नाशकात भाजपला मोठा धक्का! अंतर्गत गटबाजीमुळे दोन उमेदवारांचे अर्ज बाद; सुधाकर बडगुजरांच्या घरातील तीन अर्ज वैध

Nashik : नाशकात भाजपला मोठा धक्का! अंतर्गत गटबाजीमुळे दोन उमेदवारांचे अर्ज बाद; सुधाकर बडगुजरांच्या घरातील तीन अर्ज वैध

खैरे साहेबांनी मार्क केलेल्या लोकांना तिकिट दिलंय, आमच्यात कोणताही वाद नाही, अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण

खैरे साहेबांनी मार्क केलेल्या लोकांना तिकिट दिलंय, आमच्यात कोणताही वाद नाही, अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण

टॉप न्यूज़

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार

मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो

मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो

Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप

Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप