Fact Check: दिल्लीतील इव्हीएम विरोधी आंदोलनाचा व्हिडीओ महाराष्ट्रातील म्हणून शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रत्यक्षात, व्हायरल व्हिडिओ जानेवारी 2024 मध्ये दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनाचा आहे. याचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भाजप आघाडीच्या विजयानंतर विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता सोशल मीडियावर एका रॅलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ईव्हीएम हटवण्याच्या घोषणा दिल्या जात आहेत. काही वापरकर्ते हा व्हिडिओ शेअर करत असा दावा करत आहेत की हा व्हिडिओ महाराष्ट्रातील ईव्हीएम विरोधातील आंदोलनाचा आहे.
विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रत्यक्षात, व्हायरल व्हिडिओ जानेवारी 2024 मध्ये दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनाचा आहे. याचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही.
व्हायरल पोस्ट काय आहे?
फेसबुक वापरकर्ते राजेश कुमार सिंघानिया यांनी 27 नोव्हेंबर रोजी हा व्हिडिओ शेअर (आर्काइव लिंक) करत लिहिले,
“ही गर्दी पाहून असं वाटतंय की जनता महाराष्ट्रात चोरी करून तयार झालेल्या नवीन सरकारला बनूच देणार नाही. EVM विरोधातील ही गर्दी खूप मोठी आहे.”
पडताळणी
व्हायरल व्हिडिओमध्ये ‘ईव्हीएम हटवा-देश वाचावा’ अश्या घोषणा ऐकायला येत आहेत. याच्या आधारावर कीवर्डद्वारे शोध घेतल्यावर 24 फेब्रुवारी 2024 रोजी Special India News यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडिओ मिळाला. यामध्ये सुरुवातीला व्हायरल व्हिडिओ दिसतो. या व्हिडिओत माहिती दिली आहे की दिल्लीत जंतर-मंतर येथे ईव्हीएमच्या विरोधात हे आंदोलन झाले आहे.
1 फेब्रुवारीला एक्स वापरकर्ते ॲडव्होकेट सुजित पासी यांनीही व्हायरल व्हिडिओ अपलोड केला आहे.
भारत का बच्चा बच्चा EVM को तोडगा#चुनाव_आयोग_पर_महामोर्चा pic.twitter.com/gJAsJxIzpU
— Adv.Sujeet Pasi (@advsujeetpasi) February 1, 2024
जय भीम गुजरात यूट्यूब चॅनेलवर 31 जानेवारी 2024 रोजी या आंदोलनाचा दुसरा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. यामध्येही याच घोषणा ऐकायला येत आहेत. व्हिडिओत दिल्लीत जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनाचा उल्लेख आहे. व्हायरल व्हिडिओमधील लोकेशन या व्हिडिओत देखील दिसते.
अमर उजालाच्या वेबसाइटवर 31 जानेवारीला प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा, आणि बहुजन मुक्ती पार्टी यांसारख्या 22 संघटनांनी ईव्हीएमच्या विरोधात जंतर-मंतर येथे आंदोलन केले होते.
यावरून हे स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओ जवळपास 9 महिन्यांपूर्वीचा असून तो दिल्लीतील जंतर-मंतर येथील आहे.
यासंदर्भात दिल्लीतील दैनिक जागरणचे फोटो जर्नलिस्ट ध्रुव यांचे म्हणणे आहे की, अलीकडच्या काळात येथे असे कोणतेही आंदोलन झालेले नाही. व्हायरल व्हिडिओ हा जुना आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील माहितीच्या आधारावर, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप 132 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
आजतकच्या वेबसाइटवर 27 नोव्हेंबरला छापलेल्या बातमीनुसार, महाराष्ट्र निवडणुकीनंतर विरोधी पक्षांनी पुन्हा ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
26 नोव्हेंबरला दैनिक जागरणच्या वेबसाइटवर छापलेल्या बातमीनुसार, सुप्रीम कोर्टाने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे.
जुने व्हिडिओ महाराष्ट्राशी संबंधित असल्याचा दावा करून शेयर करणाऱ्या फेसबुक यूजरच्या प्रोफाइलचे आम्ही स्कॅन केले. औरंगाबादच्या राहणाऱ्या या यूजरवर एका विचारधारेचा प्रभाव आहे.
निष्कर्ष: दिल्लीतील जंतर-मंतर येथे जानेवारी 2024 मध्ये ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन झाले होते. त्या आंदोलनाचा व्हिडिओ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतरचा असल्याचा दावा करून चुकीची माहिती पसरवली जात आहे.
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा विश्वास न्यूज वर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]