Fact Check : भारत पाकिस्तान मॅचचा दाखला देत फुटबॉल मॅचचा व्हिडिओ शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Fact Check : विश्वास न्यूजला पडताळणीत भारत पाकिस्तान मॅचचा व्हिडिओ असल्याचं सांगत फुटबॉल मॅचचा व्हिडिओ शेअर केला जात असल्याचं आढळलं.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर विविध प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्रेक्षक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं दिसून येतं. काही लोक आता हा व्हिडिओ भारत आणि पाकिस्तान मॅचनंतरचा असल्याचं सांगत शेअर केला जातोय.
विश्वास न्यूजच्या पडताळणीत व्हायरल दावा चुकीचा ठरला. सोशल मीडियावर करण्यात येत असलेला दावा जून 2024 चा आहे. एका फुटबॉल मॅचमधील प्रेक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झालीहोती. त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील असल्याचं सांगितलं जातंय.
व्हायरल काय होतंय?
इन्साग्राम यूजर 'isvideo786' आर्काईव्ह लिंक 25 फेब्रुवारी 2025 चा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की In Dubai 23/02/2025
"India vs Pakistan match k bad dkho इसीलिए इंडिया टीम पाकिस्तान नही गई"

फेसबुक यूजर Arvind Kashyap यानं व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे.त्यावर लिहिलं आहे की "इंडियाvs पाकिस्तान मॅचनंतर पाकिस्ताननं मॅच हरल्यानंतर लोकांनी स्टेडियममध्ये गदारोळ केला. भारताविरुद्ध मॅच गमावल्यानंतर दुबई स्टेडियममधील चित्र."
पडताळणी
व्हायरल व्हिडिओचं सत्य शोधण्यासाठी आम्ही की फ्रेम काढल्या आणि गुगल रिवर्स इमेजद्वारे सर्च केलं . आम्हाला व्हायरल व्हिडिओ अर्काईव्ह लिंक चं Gary Al-Smith -Journalist च्या फेसबुक पेजवर मिळाला. व्हिडिओ 4 जून 2024 ला अपलोड करण्यात आला होता. व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार ट्यूनिस डर्बीमध्ये झालेल्या फुटबॉल मॅचमध्ये एस्पेरेस क्लबनं आफ्रिकेला 2-1 नं पराभूत केलं. त्यानंतर खेळ हिंसा, मिसाईल डागणे, पोलिसांचा हस्तक्षेप आणि अनेक जण दुखापत झाल्यानंतर संपला.

आम्हाला व्हायरल व्हिडिओशी संबंधित न्यूज रिोर्ट Slaati. com या वेबसाइटवर मिळाला. 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीत सांगितलं गेलं होतं की, ट्यूनिशियाच्या आफ्रिकेतील क्लबब आणि एस्पेरांस यांच्या दरम्यान प्रेक्षक आणि पोलिसांमध्ये हिंसक घटना घडली. यामुळं रेफरीला तीन वेळ खेळ रोखावा लागला. पोलिसांनी या स्थितीला आटोक्यात आणलं.
सर्च दरम्यान आम्हाला हा व्हिडिओ फुटबॉल फॅन्स या यूट्यूब चॅनेलवर मिळाला. व्हिडिओ 4 जून 2024 ला अपलोड करण्यात आला होता.
व्हायरल व्हिडिओ काही यूजर्सनं 2024 मध्ये शेअर केला आहे.
Troubles at the Tunisian derby between Club Africain vs ES Tunis yesterday! 🇹🇳👀 pic.twitter.com/MXGcseJkru
— 𝐂𝐚𝐬𝐮𝐚𝐥 𝐔𝐥𝐭𝐫𝐚 𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥 (@thecasualultra) June 3, 2024
आम्ही दैनिक जागरणमधील क्रीडा पत्रकार वरिष्ठ प्रतिनिधी अभिषेक त्रिपाठी यांच्याकडे पाठवला. व्हिडिओ भारत पाकिस्तान मॅचनंतरचा नाही, अशी घटना घडली नाही त्यांनी म्हटलं.
भारत पाकिस्तान मॅचनंतर अनेक दावे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. ज्याचे फॅक्ट चेक रिपोर्ट इथं पाहायला मिळतील.
शेवटी आम्ही व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर कऱणाऱ्या यूजर्सची प्रोफाईल चेक केली. यूजर्ला 5668 लोक फॉलो करतात.
निष्कर्ष : विश्वास न्यूजला पडताळणीत आढळली की भारत पाकिस्तान मॅचमधील व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येतोय तो चुकीचा आहे. व्हायरल व्हिडिओ जून 2024 मधील फुटबॉल मॅचमधील आहे. ज्यामध्ये प्रेक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली होती. तो व्हिडिओ काही लोक चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत-पाकिस्तान यांच्या मॅचनंतरचा असल्याचं सांगून शेअर केलं जाातेय ते चुकीचं आहे.
Claim Review : व्हिडिओ भारत-पाकिस्तान मॅचनंतरचा आहे.
Claimed By :इन्स्टाग्राम यूजर -isvideo786
Fact Check : फसवा
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा विश्वास न्यूजवर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]























