एक्स्प्लोर

Zing Marathi Movie: टाळ्या, शिट्ट्यांचा गजरात मैफिल रंगणार, मैफिलीत अनेक रंग भरत रुपेरी पडदा गाजवणार; 'झिंग' सिनेमा लवकरच भेटीला

Zing Marathi Movie: टाळ्या, शिट्ट्यांच्या गजरात ही मैफिल किसना कशी रंगवणार? हे पाहणं या चित्रपटात रंजक ठरेल.

Zing Marathi Movie: स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो. कुणी आई-वडिलांचं, कुणी स्वतःच तर कुणी पत्नीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतं. स्वप्न पाहणं आणि ते पूर्ण करणं यांत खरं साहस आहे. स्वप्न पूर्ण करण्यात लागलेल्या एका किसनाची कथा लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. गावातील उनाड पण मनानं सच्चा आणि स्वप्नवेड्या किसनाच्या वडिलांच अपूर्ण राहिलेलं तमाशाचा फड उभारण्याचं राहिलेलं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या मेहनती लेकाचा प्रवास नव्याकोऱ्या 'झिंग' (Zing Marathi Movie) या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. येत्या 19 सप्टेंबरपासून हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

टाळ्या, शिट्ट्यांच्या गजरात ही मैफिल किसना कशी रंगवणार? हे पाहणं या चित्रपटात रंजक ठरेल. आजोबांचा विरोध, गावकऱ्यांचा अविश्वास आणि पाटलांचं राजकारण यांतून मार्ग काढत किसना वडिलांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रंगमंच गाजवणार का?, हा कठीण प्रवास तो पार करणार का? हे सारं चित्रपटात पाहायला मिळेल. बरं चित्रपटात दिसणारा हा किसना नेमका कोण आहे, ही रंगतदार भूमिका कोण साकारतय याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. शिवाय चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार हे देखील अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. गावच्या मनात प्रेम, जिद्द आणि कलेचं बीज किसना पेरु शकेल का? की, हे सगळं फक्त त्याच्या स्वप्नांपुरतच सिमीत राहील याचाही उलगडा लवकर होईल. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Cine Marathi (@cinemarathiofficial)

'ड्रीम लालटन प्रॉडक्शन' आणि 'रेडब्रिक्स मोशन पिक्चर' या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत निर्माते दिपक पेटकर आणि सौरभ किरणकुमार कुंभार निर्मित 'झिंग' हा चित्रपट दिग्दर्शक अमित वाल्मिक कोळी दिग्दर्शित आहे.  तर हा संपूर्ण चित्रपट प्रताप जोशी यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. तर संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. मुकुंद भालेराव, मंदार चोळकर आणि शुभम चौधरी यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर नृत्य दिग्दर्शक म्हणून आशिष पाटील यांनी बाजू सांभाळली आहे. 'झिंग' हा चित्रपट संगीतमय मैफिलीत अनेक रंग भरणारा आहे. येत्या 19 सप्टेंबरपासून हा चित्रपट जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
Embed widget