एक्स्प्लोर

Zanai Bhosle Insta Post After Asha Bhosle Demise: आजीला शेवटचं पाहून हमसून हमसून रडली, आशा भोसलेंच्या निधनानं लाडकी नात पुरती खचली; इमोशनल पोस्ट करत म्हणाली...

आशाजींना अखेरचा निरोप देताना साऱ्यांचेच डोळे पाणावले होते. विशेषतः त्यांची नात जनाई भोसलेला (Janai Bhosle) आजीला शेवटचं बघणं फार जड गेलं.

Zanai Bhosle Insta Post After Asha Bhosle Demise: शतकानुशतके भारतीयांच्या मनावर आपल्या आवाजाचं गारुड घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वात मोठी पोकळी तयार झालीय. रविवारी   मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात  त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आशाजींना अखेरचा निरोप देताना साऱ्यांचेच डोळे पाणावले होते. विशेषतः त्यांची नात जनाई भोसलेला (Janai Bhosle) आजीला शेवटचं बघणं फार जड गेलं. आजीच्या आठवणींनी जनाई व्याकूळ झाली होती. आशाजींना अखेरचा निरोप दिल्यानंतर जनीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.आजी-नातीचं  हे नातं अतिशय खास आणि जिव्हाळ्याचं होतं. (Asha Bhosle Passed Away)

जनाई भोसले यांची आजीसाठी खास पोस्ट 

जनाई भोसलेने आजीच्या निधनानंतर इंस्टावर स्टोरी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. तिने लिहिलं, “भावनांनी पूर्णपणे भरून गेले आहे, वेळ मिळेल तेव्हा काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करेन. पण मला इतकंच सांगायचं आहे की आज इतक्या लोकांनी तिला मान दिला, सन्मान केला आणि तिच्यावर अफाट प्रेम व्यक्त केलं.तुमचे मनापासून आभार. ती खरोखरच या प्रेमास पात्र होती. मला जाणवत राहतं की ती आपल्या प्रत्येकाच्या मनात कायम जिवंत राहतील आणि वरून हे सगळं तिने  पाहिलं आहे.” असं जनाईने लिहिलं. अंत्यविधीचा फोटो पोस्ट करत तिने हे लिहिलंय. ‘गुडबाय माय लव्ह, लव्ह ऑफ माय लाइफ’ असं तिनं लिहित आजीला अखेरचा निरोप दिला.आजीच्या निधनाने जनाई पूर्णपणे खचली असून ती खूपच भावूक झाल्याचं दिसत आहे.


Zanai Bhosle Insta Post After Asha Bhosle Demise: आजीला शेवटचं पाहून हमसून हमसून रडली, आशा भोसलेंच्या निधनानं लाडकी नात पुरती खचली; इमोशनल पोस्ट करत म्हणाली...
Zanai Bhosle Insta Post After Asha Bhosle Demise: आजीला शेवटचं पाहून हमसून हमसून रडली, आशा भोसलेंच्या निधनानं लाडकी नात पुरती खचली; इमोशनल पोस्ट करत म्हणाली...

कोण आहे जनाई भोसले?

जनाई भोसले ही  आशा भोसले यांच्या धाकट्या मुलाची म्हणजेच आनंद भोसले यांची मुलगी आहे. 2002  साली मुंबईत तिचा  जन्म झाला. तिने  स्वित्झर्लंडमधील प्रतिष्ठित ‘इन्स्टिट्यूट ले रोजी’मधून शिक्षण पूर्ण केलं आहे. आपल्या आजीच्या पावलावर पाऊल ठेवत जनाईने संगीत क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मधुर आवाजाने त्या रसिकांची मनं जिंकताना दिसतेय.

हेही वाचा:

Asha Bhosle Grand Doughter Zanai Bhosle : आशाताईंची एक नात सुपरस्टार, दुसरी त्यांच्याच पावलावर टाकतेय पाऊल; प्रकृतीविषयी अपटेड दिलेली जनाई भोसले कोण?

महत्त्वाच्या बातम्या

Rekha Fitness Transformation: 'रेखा आधी जाड होती, इतकी सुंदरही नव्हती' मेहुण्यानं सांगितला रेखाच्या ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, इतकी सुंदरही नव्हती' मेहुण्यानं सांगितला रेखाच्या ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget