40 तासांसाठी Digital Arrest मध्ये होता युट्युबर; स्कॅमर्सनी गंडवलं, बंदी बनवून नको-नको त्या मागण्याही केल्या
Ankush Bahuguna Digital Arrest: प्रसिद्ध YouTuber, Instagram इन्फ्लुएन्सर अंकुश बहुगुणाला स्कॅमर्सनी मोठा गंडा घातल्याचं समोर आलं आहे. तब्बल 40 तासांसाठी त्याला डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आलेलं.
Ankush Bahuguna Digital Arrest: प्रसिद्ध YouTuber आणि Instagram इन्फ्लुएन्सर अंकुश बहुगुणानं (Ankush Bahuguna) अलिकडेच त्याच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रकार सर्वांसोबत शेअर केला. प्रसिद्ध युट्युबरची (Youtuber) मोठी फसवणूक झाली असून एका सायबर फ्रॉडला (Cyber Fraud) तो बळी पडल्याचंही त्यानं सांगितलं. एवढंच नाहीतर, इन्फ्लुएन्सर (Insta Influencer) अंकुश बहुगुणा तब्बल 40 तासांहून अधिक काळ Digital Arrest मध्ये होता. अंकुशनं एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्याच्यासोबत घडलेली सर्व आपबिती सांगितली आणि आपल्या फॉलोअर्सना सावध राहण्याचा सल्लाही दिला.
त्यांचा फोन रिसिव्ह केला, हीच माझी सर्वात मोठी चूक
अंकुश बहुगुणानं सांगितलं की, "या प्रकरणाची सुरुवात +1 नं सुरू होणाऱ्या एका इंटरनॅशनल नंबरवरुन आलेल्या एका ऑटोमेटेड कॉलवरुन झाली. हा फोन उचलला आणि त्यांनी मला सांगितलं की, माझी कुरिअर डिलिव्हरी कॅन्सल झाली आहे. अधिक माहितीसाठी मला झिरो दाबण्याचा सल्ला दिला आणि मी त्यांचं ऐकून झिरो दाबलं... तिथेच माझी सर्वात मोठी चूक झाली."
खोट्या पोलिसांनी घाबरवलं...
स्कॅमर्सनी माझ्यावर आरोप लावला की, अंकुशनं आपल्या आधार कार्डाचा वापर करुन चीनवरुन एक अवैध पार्सल पाठवलं होतं, जे कस्टम विभागानं ताब्यात घेतलं आहे. या पार्सलमुळे आता अंकुशच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी कॉल व्हॉट्सअॅप व्हिडीओवर एका पोलीस अधिकाऱ्याला ट्रान्सफर केला.
View this post on Instagram
मनी लॉन्ड्रिंगचा आरोप लावला...
कथित अधिकाऱ्यांनी अंकुशवर मनी लॉन्ड्रिंग आणि ड्रग्स तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप लावले आणि पुरावेही तयार केले. त्याच्या कुटुंबाला त्याची बाजू घेण्यासाठी धमक्या दिल्या. "मी निर्दोष आहे हे माहीत असूनही, त्यांच्या डावपेचांनी मला घाबरवलं. त्यांनी मला सांगितलं की, जर मी सहकार्य केलं नाही, तर मला ताब्यात घेतलं जाईल, हिंसाचाराला सामोरं जावं लागेल आणि अटकही होऊ शकतं.", असं अंकुश बहुगुणानं म्हटलं.
सेल्फ कस्टडीमध्ये ठेवलं...
अंकुशसाठी सेल्फ कस्टडीची घोषणा करताना स्कॅमर्सनी त्याला 40 तासांसाठी ठेवलं. त्यांनी त्याला व्हिडीओ कॉलवर राहण्यासाठी, बाहेरच्या जगाशी कॉन्टॅक्ट तोडण्यासाठी आणि बँकेच्या अकाउंटसह इतर सगळे पर्सनल डिटेल्स शेअर करण्यासाठी भाग पाडलं. "त्यांनी माझे मेसेज, रिप्लाय आणि स्क्रिन रेकॉर्डिंगवरही लक्ष ठेवलं, मला हेल्पलेस करुन सोडलं.", असं अंकुश बहुगुणानं सांगितलं.
स्कॅमर्सनी अंकुशच्या घाबरण्याचा फायदा उचलला, मदत करण्याचं वचन दिलं आणि त्यासोबतच त्याची आक्रमक होत उलटतपासणीही घेतली. "ते फार चलाखीनं काम करतात आणि खूप घाबरवतात.", असं सांगत अंकुशनं लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. अंकुश म्हणाला, "भीतीचा प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. निर्णय घेण्याऐवजी, जागरूकता पसरवुया आणि इतरांचं रक्षण करूयात."