एक्स्प्लोर

प्रत्येक रात्र थरकाप उडवणारी, 2 तासांचा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा पाहून झोप उडेल, IMDb वर प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद

web series : रात्री थरकाप उडवणाऱ्या घटना घडतात. ओटीटीवरील हा सस्पेन्सफुल थ्रिलर सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकतोय..

web series : या वीकेंडला तुमचा काय प्लॅन आहे? कुठं फिरायला जाणार आहात की घरच्यांसोबत चहा-भजी खात पावसाचा आनंद लुटणार आहात? जर तुम्ही श्रावणा महिन्याच्या या सुंदर मौसमात घरच्या लोकांसोबत वेळ घालवायचं ठरवलं असेल, तर हा वेळ आणखी खास बनवण्यासाठी ओटीटीवर आलेली ही नवीन सस्पेन्स थ्रिलर पाहण्याचं नक्की ठरवा. कारण या छोट्या बजेटच्या क्राईम थ्रिलरनं थरकाप उडवणारं आहे.

2 तास 2 मिनिटांची ही फिल्म ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. कथा सुरू होऊन अवघ्या 10 मिनिटांतच प्रेक्षक विचार करू लागतात, "पुढे काय होणार?" फक्त 5 कोटी रुपयांत बनलेल्या या चित्रपटाचा शेवटचा सीन पाहण्यासाठी प्रेक्षक टीव्हीसमोर खिळून बसतात. सरळसोपी वाटणारी ही कथा शेवटच्या 20 मिनिटांत इतकी गुंतागुंतीची होते की, पाहणाऱ्यांच्या तोंडून आपोआपच निघतं – "आता पुढे काय?"

शाही कबीर यांच्या दिग्दर्शनात तयार झालेली ही फिल्म म्हणजे ‘रोंथ’, जी विनीत जैन, रतीश अंबट, रेंजिथ ईव्हीएम आणि जोजो जोस यांनी निर्मित केली आहे. ही एक मल्याळम क्राईम थ्रिलर फिल्म आहे, जी ओटीटीवर हिंदीतही उपलब्ध आहे.

‘रोंथ’ या शब्दाचा अर्थ म्हणजे गस्त (patrolling). ही एक अशी थ्रिलर कथा आहे, जी एका रात्री घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे.

‘रोंथ’ ही एक सस्पेन्स आणि इन्व्हेस्टिगेशन थ्रिलर फिल्म आहे. ही कथा दोन पोलिसांभोवती फिरते – एक वरिष्ठ आणि एक कनिष्ठ पोलिस अधिकारी. हे दोघं एका रात्री गस्तीसाठी बाहेर पडतात. जसजशी रात्र पुढे सरकत जाते, तसतसे हे दोघं एका गंभीर आणि विचित्र पेचात सापडतात.

गस्तीदरम्यान, हे दोघं एका मद्यधुंद वाहनचालकाला पकडून त्याच्यावर दंड करतात. याच वेळी एक कुटुंब आपल्या मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवते. त्यानंतर जे काही घडतं, ते डोकंच फिरवणारं आहे.

या चित्रपटातील सस्पेन्स, सतत घडणाऱ्या घटना आणि शेवटचा ट्विस्ट हे या चित्रपटाची मुख्य ताकद आहे. रात्रीचे दृश्य फारच सुंदरपणे चित्रीत करण्यात आले आहेत. अनिल जॉनसन यांचं पार्श्वसंगीत थ्रिलचा अनुभव अधिक तीव्र करतं. वीकेंडला ओटीटीवर पाहण्यासाठी ‘रोंथ’ ही एक अप्रतिम निवड आहे.

ही फिल्म हॉटस्टार ओटीटीवर उपलब्ध आहे. IMDb वर या चित्रपटाला 7.4 रेटिंग मिळाली आहे. लेखक व दिग्दर्शक शाही कबीर यांचा हा सिनेमा गेल्या महिन्यात 13 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. सुमारे 5 कोटी रुपये बजेटमध्ये बनलेल्या या मलयाळम सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 9 कोटींचा व्यवसाय केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sachin Pilgaonkar On PL. Deshpande: 'पु. ल. देशपांडेंनी माझ्याकडे पाहिलं अन्...'; सचिन पिळगांवकरांच्या बालपणीचा आणखी एक किस्सा

मेडिकल क्राईम थ्रिलर वेब सिरीज, एकही सुपरस्टार नाही, हिरोईनच्या अभिनयाच्या जोरावर सुपरहिट; 7.6 IMDb रेटिंग

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Embed widget