एक्स्प्लोर

Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, दिग्दर्शक विजू मानेंची पोस्ट चर्चेत!

Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, असे म्हणत त्यांनी केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

Viju Mane Post : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु आहे. आपल्यापैकी अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. या गणेशोत्सवाच्या माहोलात आता चित्रपट दिग्दर्शक विजू माने (Viju Mane) यांची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विजू माने यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत घरी येऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्याने विजू माने यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. एक पोस्ट लिहित त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, असे म्हणत त्यांनी केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टसोबतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.

काय म्हणाले विजू माने?

या पोस्टमध्ये विजू माने लिहितात, ‘खरंतर माझ्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाला दरवर्षी ते येतात. पण यावर्षी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते त्यामुळे मनात कितीही वाटत असलं तरी ते येतील का, याबद्दल शंका होती. पण खरंच मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे माझ्या घरी आले. मनमोकळ्या गप्पा मारल्या. सोबत खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आणि माजी महापौर, शिवसेना प्रवक्ते, आमचे मित्र नरेश म्हस्के हेसुद्धा होते (दरवर्षी प्रमाणे).

खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी देखील कितीही उशीर झाला तरी माझ्या घरच्या बापाचं दर्शन घेण्याची आपली सवय मोडली नाही. (मला चांगलं आठवतंय गेल्यावर्षी रात्री दीड वाजता खासदार माझ्या घरी आले होते. आणि तेव्हाही जवळपास अर्धा तास अत्यंत छान चर्चा झाली होती.) .... प्रत्येक जवळच्या माणसाच्या, कार्यकर्त्याच्या....खरंतर आमंत्रण देणाऱ्या कुणाच्याही घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेणे ही स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेली शिकवण आहे...

राजकारणातील उलथापालथ हा प्रत्येकाच्या चर्चेचा आवडीनिवडीचा विषय असतो. पण आपल्यासाठी तो माणूस महत्त्वाचा असतो जो आपल्या अत्यंत महत्त्वाच्या वेळेला धावून आलेला असतो. माझ्या बाबतीत मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे ते स्थान आहे. आणि मी कृतज्ञता (मराठीत gratitude) व्यक्त करण्याला कायम प्राधान्य देणारा माणूस आहे. मला शक्य तेव्हा, शक्य तिथे, शक्य त्या कार्यक्रमात मी त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानत असतोच.

या शिवाय गेली अनेक वर्ष मी त्यांना ओळखतोय. सामान्य माणसात मिसळून धडाडीने काम करण्याचा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांच्या धाडसाची बरोबरी करू शकेल असा एकही नेता मी पाहिलेला नाही. महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली त्यावेळी पुरात उतरून त्या रेल्वेत पोहोचून प्रवाशांना धीर देणे, सांगली कोल्हापूरच्या पुरात अगदी खांद्याइतक्या पाण्यात उतरून पूरग्रस्त लोकांच्या जवळ जाऊन त्यांना मदत करून भविष्यासाठी आश्वस्त करणे आणि सगळ्यात भीतीदायक म्हणजे ज्याकाळी माणूस शिंकला तरी पाचावर धारण बसायची अशा काळात पीपीई किट घालून स्वतः करोना रुग्णांना आधार द्यायला त्यांच्या प्रत्यक्ष जवळ पोहोचणारे नेते किती होते हे आठवून पहा. मी आणि माझा मित्र संदीप वेंगुर्लेकर आम्ही नेहमी म्हणतो, तसं पाहिलं तर आपल्याला सगळेच राजकारणी सारखेच. अनेक पक्षातल्या अनेक नेत्यांशी छान संबंध आहेत. राजकारण त्यांच्या त्यांच्या ठिकाणी असावं पण सन्मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ह्या माणसात अशी काहीतरी जादू आहे की त्यांच्यासाठी आपण 'काहीही' करू शकतो.’

हेही वाचा :

Viju Mane : कुठे चाललो आहोत आपण? विजू मानेंनी सिनेप्रेक्षकांवर साधला निशाणा

Dharmaveer : 'धर्मवीर' सिनेमात प्रसाद ओक नव्हे 'हा' अभिनेता साकारणार होता आनंद दिघेंची भूमिका

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget