Viju Mane : दिग्दर्शक म्हणून मराठी सिनेमा माझी आर्थिक गरज भागवू शकत नाही; दिग्दर्शक विजू मानेंची स्पष्टोक्ती
Viju Mane : एखादा मराठी सिनेमा करताना दिग्दर्शकाला येणाऱ्या अडचणींविषयी भाष्य करताना दिग्दर्शक विजू माने यांनी अनेक अनुभव देखील सांगितले आहेत.
Viju Mane Interview : सध्या मराठी सिनेमा हा सातासमुद्रापलिकडे गेला असला तरीही त्यामध्ये एका दिग्दर्शकाला येणाऱ्या अडचणींविषयी दिग्दर्शक विजू (Viju Mane) यांनी भाष्य केलं आहे. सौमित्र पोटे (soumitra pote) यांच्या 'मित्र म्हणे' या पॉडकास्टमध्ये विजू माने यांनी त्यांचे अनेक अनुभव सांगतले. एक दिग्दर्शक म्हणून येणाऱ्या आर्थिक अडणींविषयी देखील विजू माने यांनी यावेळी अनेक दाखले देत स्पष्टीकरण दिलं आहे.
विजू माने यांनी अनेक धाटणीच्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांंचे हे चित्रपट प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडले. कोरोना काळानंतर त्यांच्या पांडू या सिनेमाने बॉक्स ऑफीसवरही बक्कळ कमाई केली. तसेच त्यांनी शर्यत, बायोस्कोप यांसारख्येही अनेक चित्रपट दिग्दर्शिक केले आहेत.
मराठी सिनेमा दिग्दर्शक म्हणून माझी आर्थिक गरज भागवू शकत नाही - विजू माने
त्यांनी म्हटलं की, 'मराठी सिनेमा हा जर मी दिग्दर्शक म्हणून करायला लागलो तर मराठी सिनेमा माझी आर्थिक गरज भागवू शकत नाही. मी पांडू या सिनेमाचा जवळपास 8 ते 10 ड्राफ्ट घेऊन फिरत होतो. त्यानंतर माझं झी सोबत सूत जुळलं. त्यानंतर त्याची सगळी प्रक्रिया सुरु झाली. यासाठी जवळपास 16 ते 17 महिन्यांचा काळ गेला. त्यानंतर त्याला मूर्त स्वरुप मिळालं. पण त्यातून जे मला उत्पन्न मिळालं, ते जर अगदी सांगायला गेलं तर माझा ड्राईव्हर त्यापेक्षा जास्त कमावेल.'
'एखादा दिग्दर्शक इतके सिनेमे नाही करु शकत'
मराठी सिनेमांत काम करुन अनेकांनी बंगले उभारले, महागड्या गाड्या घेतल्या. आज अनेक जण मराठी सिनेमात काम करुन गर्भश्रीमंत झालेत या प्रश्नावर बोलताना विजू माने यांनी म्हटलं की, एखाद्या सिनेमात अभिनेता अभिनेत्रीचं काम हे अवघ्या 30 दिवसांचं असतं. त्यांच्यासाठी शूटींग आणि डबिंग इतकाच सिनेमा असतो. त्यांच्यासाठी एखादा सिनेमा हा दोन महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी नसतोच. एखादा प्रमुख नट एका वर्षात 6 ते 7 सिनेमे करु शकतो, पण एखादा दिग्दर्शक इतके सिनेमे करु शकतो का, असा सवाल विजू माने उपस्थित केला.
आता मी माझं मत मांडू शकतो - विजू माने
प्रामाणिक दिग्दर्शक हे नक्कीच नाही करु शकत. असे अनेक दिग्दर्शक आहेत, जे एका सिनेमामुळे वर्षभराचं कमवतात. अनेकजण एक सिनेमा झाला की दुसऱ्या सिनेमावर काम सुरु करतात, यावर विजू माने यांनी म्हटलं की, असं असलं तरीही का एखाद्या दिग्दर्शकाने मग एखादं मोठं नेटवर्क टाकलं. असं एखाद्या दिग्दर्शकाचं निर्मात्यामध्ये रुपांतर का नाही झालं असं म्हणत विजू माने यांनी त्यांचा देखील अनुभव यावेळी सांगितला. त्यांनी म्हटलं की, मी पांडू करण्याआधी नाही नाही म्हणत मला पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणून निर्मात्याला शरण जावं लागायचं. त्या सिनेमाला आवश्यक असलेली निर्मिती मूल्य देण्यासाठी मला निर्मात्याला शरण जावंच लागायचं. पण आता मी माझ्या कारकिर्दीच्या अशा टप्प्याला आलोय, जिथे मी माझं मत मांडू शकतो.
ही बातमी वाचा :
Viju Mane : 'स्ट्रगलर साला'मध्ये इतक्या शिव्या खरचं गरजेच्या आहेत का? विजू माने म्हणाले , हे तर...