(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat Kohli : 'विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये काम करायचंय'; अभिनेता विजय देवरकोंडानं व्यक्त केली इच्छा
विजयनं विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
Virat Kohli : आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्स राखून विजय मिळवला. हा सामना पाहण्यासाठी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडानं (Vijay Deverakonda) दुबईमधील स्टेडिअममध्ये हजेरी लावली. प्री-मॅच शो दरम्यान विजयनं विराट कोहलीबाबत (Virat Kohli) उपस्थित लोकांसोबत चर्चा केली. त्यावेळी विजयनं विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
जेव्हा विजयला विचारण्यात आले की, 'तुला कोणाच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल?' तेव्हा त्याने उत्तर दिले, "धोनी भाई यांची बायोपिक सुशांतने आधीच केला आहे त्यामुळे मला विराट अण्णांच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल" विजयच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
Arjun Reddy star @TheDeverakonda has expressed his desire to do a biopic on @imVkohli
— FilmiFever (@FilmiFever) August 28, 2022
When he was asked on whom would you like to make a biopic, he replied, "Dhoni bhai biopic already did by Sushant so I'm interested to do Virat anna biopic"#VijayDeverakonda #Viratkohli #Liger pic.twitter.com/M5y38ULEys
सामन्यामध्ये विराटनं 34 बॉलमध्ये 35 रन केले. जेव्हा विराट कोहली आऊट झाला तेव्हा विजयच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. यावेळी निराश झालेल्या विजयचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
see the reaction of @TheDeverakonda 🫤🫵 when the @imVkohli is Out😢
— VD_fan_prashanth ✪ (@PrashanthRamad2) August 28, 2022
We want them to RULE🙏♥️
in their own field ✅💯🙌#VijayDeverakonda #ViratKohli𓃵 pic.twitter.com/8migVaCMsT
विजय देवरकोंडानं लायगर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा चित्रपट 25 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज झाला. लायगर चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जन्ननाथ यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही करण जोहरनं केली आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी 'लायगर' या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. या चित्रपट रिलीज होण्यापूर्वी चर्चेत होता मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: