The Great Indian Family Release Date : विकी कौशल कायमच विविध भूमिकांकरता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. त्याने केलेले अनेक चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले आहेत. आता पुन्हा एकदा विकी प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरता सज्ज झाला आहे. 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा त्याचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वर्षी 22 सप्टेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटातील एक मजेदार व्हिडीओ विकीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. 


'द ग्रेट इंडियन फॅमिली'च्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये त्याची फॅमिली कशी विचित्र आहे हे दाखवले आहे. व्हिडीओनुसार चित्रपट काॅमेडी असल्याचे लक्षात येत आहे. या चित्रपटात विकीसोबत मानुषी छिल्लर देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा नेमकी कशी असणार याकरता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 


विकी दिसणार मुख्य भूमिकेत 






विक्की कौशलबद्दल बोलायचे तर तो सध्या चर्चेत आहे. त्याचा आधीचा 'जरा हटके जरा बचके' हाही बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटात तो सारा अली खानसोबत रोमान्स करताना दिसला होता आणि चाहत्यांनाही दोघांची जोडी आवडली होती. यासोबतच तो आता 'द ग्रेट इंडियन फॅमिली' मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


विकीच्या काही दिवसांपूर्वी आलेल्या 'जरा हटके जरा बचके'  चांगलीच कमाई केल होती. प्रेक्षकांना तो चित्रपट खूप आवडला होता. या चित्रपटातील गाणे देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. या चित्रपटाची कथा कपिल (विकी कौशल) आणि सौम्या (सारा अली खान) या  जोडप्यावर आधारित होती. विकी आणि सारासोबतच या चित्रपटात राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती. 2019 मध्ये रिलीज झालेल्या उरी चित्रपटानंतर विकीचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नाही. 


विकीने आतापर्यंत जवळपास 15 चित्रपटांमध्ये काम केले असून त्याच्या बहुतांश चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. विकी कौशलला उरीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. विकी उरीमध्ये आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसला होता. ' मसान ' या चित्रपटातील दमदार अभिनयाने विक्की कौशलला सर्वांनी ओळखले होते . या चित्रपटानंतर विकीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.


ही बातमी वाचा: 


Seema Haider: सीमा हैदरने दिल्या ‘हिंदुस्तान जिंदाबाद’,‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा; चित्रपटाची ऑफर नाकारली