Seema Haider: पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतामधील सचिन (Sachin Meena) या जोडप्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. सीमा आणि सचिनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सीमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती ‘हिंदुस्तान जिंदाबाद’,‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा देताना दिसत आहे.
सीमा ही सीमा हर घर तिरंगा या उपक्रमात सहभागी झाल्याचं पहायला मिळत आहे. सीमाने रविवारी (13 ऑगस्ट) तिचे वकील एपी सिंह आणि सचिन यांच्यासह नोएडा येथे तिरंगा फडकावला. सीमा आणि सचिन यांनी तिरंगा फडकवताना 'भारत माता की जय' या घोषणा दिल्या, असं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी सीमाचे वकील एपी सिंह यांनी सांगितले की, सीमा बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणार नाही आणि तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची ऑफर देखील नाकारली आहे.
सीमाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती ‘हिंदुस्तान जिंदाबाद’,‘पाकिस्तान मुर्दाबाद’ या घोषणा देताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
सीमा हैदरला बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची ऑफर आल्याची चर्चा सुरु होती. हे सर्व नाटक त्वरित बंद करा, नाहीतर मनसेच्या कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा मनसे (MNS) नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी दिला. अमेय खोपकर यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, "कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत स्थान मिळू नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. पाकिस्तानी महिला सीमा हैदर सध्या भारतात आहे. ती ISI एजंट असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. आमच्या चित्रपटसृष्टीतील काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी सीमा हैदरला अभिनेत्री बनवण्याचा प्रयत्न करत आहेत." आता सीमानं चित्रपटाची ऑफर नाकारली आहे, अशी माहिती तिच्या वकिलांनी दिली आहे.
सीमा आणि सचिन यांची ओळख PUBG या गेमिंग अॅपच्या माध्यमातून झाली. सुरुवातीला त्यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सचिनच्या प्रेमासाठी सीमा पाकिस्तान सोडून भारतात आली, असं म्हटलं जात आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Seema Haider: 'हे सगळं बंद करा, नाहीतर...'; सीमा हैदरवर बनत असलेल्या चित्रपटावरुन मनसेचा इशारा