Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Girish Oak :'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेत येणार ट्विस्ट; डॉ. गिरीश ओक दिसणार एका वेगळ्या भूमिकेत
Girish Oak Entry In Karan Gunhyala Mafi Nahi Marathi Serial : 'कारण गुन्ह्याला माफी नाही' (Karan Gunhyala Mafi Nahi) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्मिते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. आता या मालिकेत अभिनेते डॉ. गिरीश ओक (Girish Oak) यांची एन्ट्री होणार आहे. गिरीश ओक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Taali: लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार; सुष्मिताची 'ताली' मराठी सेलिब्रिटींची
Taali: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) 'ताली' (Taali) या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या वेब सीरिजचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. या वेब सीरिजमध्ये काही मराठी देखील कलाकारांनी देखील काम केलं आहे. तसेच या वेब सीरिजचा दिग्दर्शक आणि लेखक देखील मराठी आहे. जाणून घेऊयात ताली या वेब सीरिजच्या टीमबाबत...
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Gashmeer Mahajani: 'आयुष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. काही घडत नाहीये, काय करु यार...'; नेटकऱ्याचा प्रश्न, गश्मीर उत्तर देत म्हणाला, 'मी पण...'
Gashmeer Mahajani: अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. गश्मीर त्याच्या आगामी प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देतो. गश्मीरनं नुकतेच इन्स्टाग्रामवर ‘आस्क गश’ (Ask Gash) हे सेशन ठेवले. या सेशनच्या माध्यमातून त्यानं चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरं दिली.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Baipan Bhaari Deva : 'सैराट'चा रेकॉर्ड मोडणार 'बाईपण भारी देवा'? कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क
Baipan Bhaari Deva Box Office Collection : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा 30 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून आजही या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. एकीकडे प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहावा यासाठी निर्माते वेगवेगळे फंडे आजमावत आहेत. तर दुसरीकडे हा सिनेमा दिवसेंदिवस वेगवेगळे रेकॉर्ड्स आपल्या नावे करत आहे. लवकरच हा सिनेमा नागराज मंजुळेंच्या 'सैराट'चा (Sairat) रेकॉर्ड मोडू शकतो.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Siddarth Jadhav: "त्यांच्या आशीर्वादाने मी जग बघायला फिरलो आणि आज..."; सिद्धार्थच्या आई-बाबांची फॉरेन टूर
Siddarth Jadhav: अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddarth Jadhav) हा सोशल मीडियावर त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देतो. सिद्धार्थ त्याच्या अभिनयानं आणि विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतो. सिद्धार्थनं नुकतीच त्याच्या आई वडिलांसाठी फॉरेन टूर प्लॅन केली आहे. याबाबत सिद्धार्थनं एक खास पोस्ट शेअर करुन माहिती दिली.