कॅटरिना कैफ आणि विकी कौशलने गुपचुप उरकला साखरपुडा? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
विकी आणि कॅटरिनाला अनेकदा एकत्र पाहिलं आहे. परंतु, त्यांच्यातील कुणीही या नात्यावर फारसं काही बोलताना दिसत नाहीत. पण त्यांच्या वागण्यातून चाहत्यांनी विकी आणि कॅटरिना एकत्र असल्याचा अंदाज लावला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर सगळ्यात जास्त चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांची. विकी आणि कतरिना यांच्यात नेमकं काय नातं आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. विकी आणि कॅटरिनाला अनेकदा एकत्र पाहिलं आहे. परंतु, त्यांच्यातील कुणीही या नात्यावर फारसं काही बोलताना दिसत नाहीत. पण त्यांच्या वागण्यातून चाहत्यांनी विकी आणि कॅटरिना एकत्र असल्याचा अंदाज लावला आहे. सध्या बॉलिवूडच्या कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांचा साखरपुडा झाल्याचे वृत्त सगळीकडे चर्चेत आहे.
प्रसिद्ध पापाराझी विरल भयानीच्या एका पोस्टनुसार, "विकी आणि कॅटरिनाने साखरपुडा केला आहे. तरीही त्यांनी अधिकृतपणे सांगण्याची वाट आपण पाहूया." या पोस्ट नंतर दोघांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. परंतु या निव्वळ अफवा असून त्यांचा साखरपुडा झालेला नाही.
मनोरंजन वाहिनी झूमने दिलेल्या माहितीनुसार, कॅटरीनाच्या टीमने साखरपुडा झाला नसल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे. कॅटरीनाची टीम म्हणाली की, साखरपुड्याचा कोणताही कार्यक्रम झालेला नाही. कॅटरीना सध्या Tiger 3 च्या चित्रीकरणाची तयारी करत असून लवकरच त्यासाठी जाणार आहे.
कॅटरीनाच्या येणाऱ्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर कॅटरिना रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी चित्रपटात दिसणार आहे. कोरोनामुळे या चित्रपटाला उशीर झाला आहे. तसेच सिद्धार्थ चतुर्वेदी , ईशान खट्टर यांच्यासह फोन भूत या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात कॅटरिनाने आपल्या जी ले जरा या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट रोड ट्रीपवर आधारित असून आलिया भट्ट आणि प्रियंका चोप्रा-जोनस मुख्य भूमिकेत असणार आहे. तर उरी स्टार विकी कौशल सरदार उधम सिंह, सॅम बहादुर, द ग्रेट इंडियन फॅमिली आणि मि. लेले या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
विकी आणि कॅटरीनाने आपल्या नात्यावर कधीच भाष्य केले नाही. अभिनेत्री सोनम कपूरचा भाऊ आणि अभिनेता हर्षवर्धन कपूरने एका मुलाखतीमध्ये दोघांच्या नात्याचा खुलासा केल्यानंतर चर्चा सुरू झाल्या. अलीकडेच ही जोडी ‘शेरशाह’ चित्रपटाच्या प्रीमिअरला एकत्र दिसले होते. तसेच काही दिवसांपूर्वी कॅटरीनाच्या इमारतीखाली पार्क केलेल्या विकीच्या गाडीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायल झाले होते. यामुळेच कदाचीत चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे वेध लागले होते.