Vicky Kaushal : विकी कौशलचा 13 वर्षापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; लूक पाहून नेटकरी आश्चर्यचकित
Vicky Kaushal : विकीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Vicky Kaushal 13 Years Old Video Goes Viral : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal)नेहमी चर्चेत असतो. सध्या विकी त्याच्या 13 वर्षापूर्वीच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. विकीचा एक जूना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 13 वर्षापूर्वी विकी अॅक्टिंग स्कूलमध्ये जात होता. त्यावेळी त्या अॅक्टिंग स्कूलमध्ये तो वेगवेगळे अॅक्ट सादर करत होता. त्याच्या एका अॅक्टचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री शिरीन मिर्जा दिसत आहे. इंस्टाग्रामवर एका यूझरनं हा व्हिडीओ शेअर केला असून त्यानं कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'हा व्हिडीओ पाहून तुम्ही खूप हसाल' व्हिडीओमधील विकीच्या लूकनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. विकीचा सध्याचा लूक आणि 13 वर्षापूर्वीचा लूक यामध्ये बराच फरक आहे, अशा कमेंट्स विकीच्या चाहत्यांनी या व्हिडीओला केल्या आहेत.
View this post on Instagram
विकीच्या चित्रपटांना त्याच्या चाहत्यांनी नेहमी पसंती मिळते. त्याच्या उरी : द सर्जिकल स्ट्राइक, मसान या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. लवकरच त्याचा 'लुका छुपी 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Kiran Mane : किरण मानेंच्या पत्नीने राज्य महिला आयोगाकडे केली तक्रार
- Pawankhind Movie : दिग्पाल लांजेकरांच्या 'पावनखिंड' सिनेमाचा मुहूर्त अखेर ठरला, 18 फेब्रुवारीला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha