एक्स्प्लोर

Ashok Saraf: 'एन्ट्री आधीच माझ्या पायजम्याची नाडी तुटली अन्..'; शोमध्ये अशोक सराफांनी सांगितला मजेदार किस्सा

Ashok Saraf Shares Unforgettable Theatre Incident: अशोक सराफ यांनी 'कोन होईल मराठी करोडपती' शोमध्ये नाटकातील एक मजेशीर प्रसंग सांगितला.

Ashok Saraf Funny Theatre Incident: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचे चित्रपट आजही आवर्जून पाहिले जातात.   त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत केवळ मराठीच (Entertainment) नाही तर, हिंदी सिनेमांमध्येही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अशोक सराफ यांनी केवळ चित्रपटात काम नसून, नाटक आणि अनेक मालिकाही गाजवल्या आहेत. ते बऱ्याचदा मुलाखतीतून सिनेमा, मालिका किंवा नाटकातील (Marathi Natak) खास किस्से शेअर करत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी कोण होईल मराठी करोडपती या सुपरहिट शोमध्येही हजेरी लावली होती.  हॉट सीटवर बसून त्यांनी अभिनेते आणि होस्ट सचिन खेडेकरसोबत खेळ खेळत गप्पा गोष्टी केल्या.  यावेळी त्यांनी नाटकाचा एक मजेदार किस्सा शेअर केला.   

अशोक सराफ यांनी सांगितला प्रेमा तुझा रंग कसा नाटकातील मजेदार किस्सा (Ashok Saraf Prema Tuzha Rang Kasa play)

अशोक सराफ यांचा प्रेमा तुझा रंग कसा, हे नाटक प्रचंड गाजलं. या नाटकात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. या नाटकातील त्यांनी एक किस्सा शेअर केला. नाटकाच्या एन्ट्रीवेळी त्यांच्या पायजम्याची नाडी तुटली होती, त्यानंतर नेमकं काय घडलं? याचा पुढचा किस्सा त्यांनी शोमध्ये शेअर केला,  अशोक सराफ म्हणाले, 'मी एन्ट्रीसाठी उभा होतो. दोन वाक्य संपली की माझी एन्ट्री होती. सदरा - पायजमा असा माझा ड्रेस होता. समोरच्याचं दोन वाक्य संपण्याआधी माझ्या पायजम्याची नाडी तुटली'.

एन्ट्रीपूर्वी अशोक सराफ यांच्या पायजम्याची नाडी तुटल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती (Veteran Marathi actor Ashok Saraf theatre memories)

'पायजम्याची नाडी तुटली आणि पायजमा खाली पडला. मी लगेच पायजमा उचलला.  आता काय करावं मला कळत नव्हतं. मी इकडे तिकडे पाहू लागलो,  आजूबाजूलाही कुणी नव्हतं. तिथे वाक्य संपत आलं होतं आणि इथे मला टेन्शन आलं होतं. माझी नजर वरती गेली. मी वर पाहिलं  बाजूला एक फ्लॅट सीन होता. त्या फ्लॅट सीनवर मी एक सुंब पाहिला होता. मी सुंब घेतला आणि पायजमा बांधला. यानंतरचा सगळा पुढचा अंक मी त्यावर केला',  असं अशोक सराफ म्हणाले.

'मला एक गोष्ट कळत नाहीये की, आजूबाजूला स्वच्छता असताना,  फ्लॅट सीनवर सुंब नेमका कुणी ठेवला? मी तर नाही ठेवला, तो सुंब नेमका आला कुठून? त्याच वेळेला माझं लक्ष जावं, तो सुंब मला दिसावा  आणि तो मी बांधावा.. अन् मी पुढचं नाटक पूर्ण करावं.  जर सुंब मला मिळाला नसता तर काय झालं असतं, अगदी नामुष्कीची गोष्ट झाली होती. मला पडदा पाडावा लागला असता', असंही अशोक सराफ म्हणाले.

'आपण रंगदेवता म्हणतो ना, म्हणजे खरंच रंगदेवता आहे. आयत्या वेळेला रंगदेवता तुम्हाला विसरायलाही लावते, ब्लँकही करते, कधी वाक्यात गडबडही होते, हे सगळं ती करत असते. आपण तिच्यापुढे कुणीच नाही, हे मी त्या प्रसंगातून शिकलो', असा किस्सा शेअर करत अशोक सराफ यांनी नाटकातील आठवणींना उजाळा दिला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

38 वर्षीय अभिनेत्री लवकरच होणार आई; वाढदिवशीच पार पडला बेबी शॉवर, प्रेग्नन्सी ग्लोने वेधलं लक्ष

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget