एक्स्प्लोर

Veen Doghantali Hi Tutena Actress Poorva Gokhale: 'वीण दोघांची ही तुटेना' मालिकेत समरच्या Ex- गर्लफ्रेंडची एन्ट्री; 'किमया'च्या एन्ट्रीनं मालिकेत नव वळण

Veen Doghantali Hi Tutena Actress Poorva Gokhale: किमया हे  केवळ एक नवं पात्र नसून ती  समरची जुनी मैत्रीण आणि त्याची Ex- गर्लफ्रेंड आहे. आता स्वानंदी आणि समरचं नातं आणखी खुलणार की, वेगळ वळण घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Veen Doghantali Hi Tutena Actress Poorva Gokhale: झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय मालिका 'वीण दोघांची ही तुटेना' (Veen Doghantali Hi Tutena) सध्या एका अतिशय मनोरंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत एका अशा पात्राची एन्ट्री झाली आहे, ज्यामुळे कथानकात मोठी उलथापालथ होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री पूर्वा गोखले (Poorva Gokhale) या मालिकेत 'किमया' ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून, या निमित्तानं प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पुन्हा एकदा झी मराठीच्या कुटुंबात परतली आहे. किमया हे  केवळ एक नवं पात्र नसून ती  समरची जुनी मैत्रीण आणि त्याची Ex- गर्लफ्रेंड आहे. परदेशातून भारतात परतल्यानंतर ती थेट समरच्या घरी राहायला येते, ज्यामुळे घरातील वातावरण आणि नात्यांची समीकरणे पूर्णपणे बदलून जाणार आहेत. 

पूर्वा गोखले यांनी आपल्या भूमिकेबद्दल सांगताना स्पष्ट केल की, "किमया' ही व्यक्तिरेखा अतिशय मनमोकळी, आनंदी आणि समोरच्या व्यक्तीचा किंवा परिस्थितीचा विचार न करता मनात येईल ते स्पष्टपणे बोलणारी मुलगी आहे. किमया आणि समरची मैत्री खूप जुनी आणि घट्ट असल्याने त्यांच्यातील जवळीक पाहून स्वानंदीच्या मनात जेलसी निर्माण होताना दिसणार आहे. 40 वर्षांची असूनही किमयाचा उत्साह एखाद्या विशीतल्या मुलीसारखा आहे. पाश्चिमात्य पेहराव आणि बिनधास्त स्वभाव यामुळे हे पात्र प्रेक्षकांसाठी नक्कीच वेगळे आणि मनोरंजक वाटेल..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by poorva gokhale (@poorvagokhale)

सुबोधसोबत काम करताना कोणताही संकोच वाटला नाही... : पूर्वा गोखले

"प्रेक्षकांसाठी सर्वात मोठं आकर्षण म्हणजे, सुबोध आणि मी तब्बल 15-16 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर एकत्र दिसत आहोत. 2010 मध्ये 'कुलवधू' मालिकेत विक्रमादित्य आणि देवयानी या जोडीनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. तेव्हापासून ही जोडी पुन्हा एकत्र कधी दिसणार, अशी विचारणा चाहते माझ्याकडे सातत्यानं करत होते. मला आशा आहे की, हे भाग प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेचं दिग्दर्शक 'कुलवधू'च्या वेळी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते, त्यामुळे सेटवर मला 'कंफर्ट झोन' मिळाला. जुनी मैत्री असल्याने सुबोधसोबत काम करताना कोणताही संकोच वाटला नाही...", असं पूर्वा गोखले म्हणाली आहे.  

"गेल्या काही काळापासून मी हिंदी मनोरंजन सृष्टीत व्यस्त होते, त्यामुळे मराठी प्रेक्षकांपासून  काहीशा दूर झाले होते आणि मराठी प्रेक्षक वारंवार मला  पुन्हा मराठी मालिकांकडे वळण्याची विनंती करत होते. किमयाच्या निमित्ताने एक सशक्त आणि आव्हानात्मक पात्र मिळाल्यामुळे मी हा रोल स्वीकारला. जेव्हा किमयाच  प्रोमो प्रेक्षकांनी पहिला तेव्हा जो उदंड प्रतिसाद मिळाला, त्यावरून ही जोडी आजही प्रेक्षकांच्या तितकीच पसंतीस उतरत असल्याचे सिद्ध झाले आहे.", असं पूर्वा गोखले म्हणाली आहे. दरम्यान, आता किमायाच्या येण्यानं समर आणि स्वानंदीच्या आयुष्यात काय वादळ येत, हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sairat Fame Arbaaz Sheikh Lovestory: 'सैराट'फेम सल्याचं 3 वर्षांपूर्वीच झालंय लग्न! लहानपणापासूनच आवडायची सिमरन, तिला मिळवण्यासाठी ... ; अरबाझ शेखनं सांगितली हटके लव्हस्टोरी

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Embed widget