कियाराला किस, आलियाशी फ्लर्ट, वरुण धवनने लाईव्ह शोमध्ये पातळी सोडली? खुद्द त्यानेच सांगितलं 'त्या' कृत्यामागचं सत्य!
वरुण धवनने कियारा आडवाणीला एका फोटोशूटदरम्यान किस केलं होतं. तर आलिया भट्टच्या पोटावर मारलं होतं. त्या कृतींमुळे त्याला चांगलंच ट्रोल करण्यात येत होतं
मुंबई : बॉलिवुड हे असं क्षेत्र आहे, जिथं नेहमीच काहीतरी घडतंच असतं. बॉलिवुडमधील प्रेकरणांही चर्चा होते. बॉलिवुडमध्ये एकदा बस्तान बसलं की नाव आणि पैसा अशा दोन्हींचाही पाऊस पडतो. मात्र याच बॉलिवुडमध्ये अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या एखाद्या कृत्यामुळे मोठे वादळ झाल्याचं पाहायला मिळतं. वरुण धवनने केलेल्या दोन कृत्यांमुळे त्याला नेहमी ट्रोल केलं जातं. त्याच्यावर वेगवेगळे आरोप केले जातात. यावरच त्याने सगळं सांगून टाकलं आहे. आलियाशी केलेलं फ्लर्टिंग आणि कियारा आडवाणीला केलेल्या किसमागची गोष्ट त्याने सांगितली आहे.
वरुण धवनने कियाराला केलं होतं किस
वरुण धवनने एका पॉडकास्टमध्ये यावर भाष्य केलं आहे. दोन वेगेवगळ्या कार्यक्रमात वरुण धवनने ही कृत्यं केली होती. काही दिवसांपूर्वी वरुण धवनने एका कार्यक्रमात आलिया भट्टच्या पोटाला हात लावला होता. त्यानंतर आलिया भट्टनेही मस्करीमध्ये त्याच्या डोक्यावर मारले होते. तर दुसऱ्या वरुण धवन कियारा आडवानीसोबत एक फोटोशूट करत होता. यावेळी फोटोशूट चालू असताना वरुण धवनने कियाराच्या कालावर किस केलं होतं. त्यानंतर कियारा आडवाणी आश्चर्यचिकत झाली होती. तिने डोळे मोठे करून वरुणाच्या खांद्यावर मारलं होतं.
या दोन्ही प्रसंगांनंतर वरुण धवन महिला अभिनेत्रींसोबत पातळी सोडून वागतो का? असे विचारले जाऊ लागले. काही लोकांनी तर त्याला ट्रोलही केले. याबाबत त्याला एका पॉडकास्टमध्ये विचारण्यात आले. त्यानंतर या दोन्ही घटनांमागचे सत्य खुद्द त्यानेच सांगितले आहे.
वरुण धवन नेमकं काय म्हणाला?
कियारा अडवाणीला मी गालावर किस केलं ते सगळं सुनियोजित होतं. तो सर्व प्रसंग प्लॅण्ड होतं. तो प्रसंग कियारा आणि मी दोघांनाही सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. कियारा आडवाणी चांगली अभिनेती आहे. त्यावेळी तिने चांगला अभिनय केला आहे, असं वरुण धवनने सांगितलं.
आलियासोबत फक्त मस्करी केली
आलिया भट्टसोबत घडलेल्या प्रसंगावरही वरुण धवनने प्रतिक्रिया दिली. आलियाच्या पोटावर मी मस्ती म्हणून मारलं होतं.ती कृती फ्लर्टिंग नव्हती. मी मस्करी म्हणून तसं केलं होतं. आलिया माझी मैत्रिण आहे, असं वरुण धवनने सांगितलं.
हेही वाचा :
निळ्याशार समुद्रात अवतरली सुंदरी, 23 वर्षांच्या अवनीतच्या ब्लू ड्रेसमधील फोटोंची चर्चा!
Tharla Tar Mag : आय लव्ह यु मिसेस सायली! अखेर अर्जुनने दिली प्रेमाची कबुली, होणार एक नवी सुरुवात?