एक्स्प्लोर

Vaishnavi Hagawane Death Case: 'आता वचक बसणं गरजेचं...'; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी मराठी अभिनेत्री संतापली, थेट मुख्यमंत्र्यांना टॅग करुन म्हणाली...

Marathi Actress On Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवीनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यावर सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते.

Marathi Actress On Vaishnavi Hagawane Death Case:  संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केली आहे. त्याचसोबत वैष्णवीचा दीर सुशीललाही अटक करण्यात आली आहे. वैष्णवीनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यावर सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर आज पहाटे साडेचारच्या सुमाराला या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केलीय. वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक  झालीय. 

वैष्णवीनं 16 मे 2025 रोजी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीनं स्वतःचं आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशातच आता या प्रकरणावर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. सेलिब्रिटींसह अनेकांनी याप्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. अशातच एका मराठी अभिनेत्रीनंही सोशल मीडियावरुन याप्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. अश्विनी महांगडेनं सोशल मीडियावर पोस्ट केलीय. 

मराठी अभिनेत्री इन्स्टा पोस्टमध्ये काय म्हणाली? 

मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलंय की, "ही माणसं शिकलेली, पैशानं श्रीमंत असली तरीही मानसिकता... सुनेला मारहाण करून, दरवेळी माहेरकडून काहीना काही आणायला सांगणं ही क्रूर बाब आहे आणि आरोपींना योग्य ती शिक्षा व्हायला हवी." पुढे बोलताना ती म्हणाली की, "आता जर हे प्रकरण दाबले, तर पुन्हा एकदा पैसे आणि पद यांचा विजय होईल आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. यावर आताच वचक बसणे गरजेचे आहे." तसेच, अश्विनीनं स्टोरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग करुन त्याखाली आपलीच लाडकी बहीण असं म्हटलं आहे. त्याखाली अश्विनीनं या घटनेचा जाहीर निषेध असंही म्हटलं आहे. 


Vaishnavi Hagawane Death Case: 'आता वचक बसणं गरजेचं...'; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी मराठी अभिनेत्री संतापली, थेट मुख्यमंत्र्यांना टॅग करुन म्हणाली...

अश्विनी व्यतिरिक्त हेमंत ढोमेनंही केलीय पोस्ट 

दिग्दर्शक, अभिनेता हेमंत ढोमे यानंही वैष्णवी आत्महत्या प्रकरणी पोस्ट केली आहे. हेमंत ढोमे म्हणाला की, "आजच्या काळात हुंडाबळी गेलाय, आजच्या काळात तरी अशी घटना होऊ नये म्हणून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे." 

दरम्यान, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिष्णा राजेंद्र हगवणे यांना अटक केली आहे. तर, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे तब्बल सात दिवस फरार होते. अखेर आज पहाटे दोघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्र वैष्णवीच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या क्रूर सासरच्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा ठोठवावी, अशी मागणी करतोय. 

महत्त्वाच्या बातम्या

Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
Crime Petrol Host: अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'

व्हिडीओ

Manoj Jarange Convoy Vehicles Accident : जरांगेंच्या ताफ्यातील 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Embed widget