एक्स्प्लोर

Ustad Zakir Hussain: "झाकिर हुसैन हयात आहेत, मृत्यूच्या बातम्या निराधार"; बहीण खुर्शीद यांची ABP माझाला माहिती, म्हणाल्या...

Ustad Zakir Hussain: झाकीर हुसैन यांची बहीण खुर्शीद औलिया यांनी तबला वादकाच्या मृत्यूचं वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. अशा खोट्या बातम्या पसरवू नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Zakir Hussain: जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन (Ustad Zakir Hussain) यांची तब्येत खालावली असून गेल्या काही वर्षांपासून हृदयाशी संबंधित आजाराशी ते झुंज देत आहेत. अमेरिकेतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती त्यांची बहीण खुर्शीद यांनी एबीपी न्यूजशी बोलताना दिली आहे. त्यांचा मृत्यू झालेला नसून ते अजूनही हयात आहेत, अशी माहितीदेखील त्यांनी दिली आहे. दरम्यान, अमेरिकेतील रुग्णालयात झाकीर हुसैन यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. अशातच या सर्व अफवा असून ते अजुन हयात आहेत. अमेरिकेतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांच्या बहिणीनं एबीपी न्यूजशी बोलताना दिली आहे. 

एबीपी न्यूजनं लंडनमध्ये राहणाऱ्या झहीर हुसैन यांची मोठी बहीण खुर्शीद औलिया यांच्याशी संवाद साधला. खुर्शीद औलिया यांनी भाऊ झाकीर हुसैन यांच्या मृत्यूचं वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. खुर्शीद म्हणाल्या की, त्यांची मुलगी सध्या सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात आहे आणि काही काळापूर्वी त्यांच्या मुलीनं झाकीर हुसैन अजूनही हयात असल्याचं सांगितलं आहे. 

उस्ताद झाकीर हुसैन यांची बहीण खुर्शीद यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, "त्यांची प्रकृती चिंताजनक असली, तरी ते हयात आहेत. त्यांच्या मृत्यूची बातमी पसरवणारे कोणाच्या वतीनं त्यांच्या मृत्यूची पुष्टी करत आहेत? आणि ते असं का करत आहेत?" तसेच, कुटुंबीयांनी तरी अद्याप असं कोणतंही वक्तव्य जारी केलेलं नाही, असंही त्या म्हणाल्या. 

भावाच्या आजारपणामुळे त्यांना अमेरिकेला जावं लागलेलं, पण काही कारणास्तव त्या जाऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळेच मुलीला तिथे पाठवावं लागल्याचं खुर्शीद यांनी सांगितलं. जास्त काम, धावपळ, थकवा, विश्रांतीचा अभाव आणि आहाराकडे लक्ष न देणं यांमुळे झाकीरच्या हृदय आणि यकृतावर विपरीत परिणाम झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं. तसेच, पुढे बोलताना त्यांनी झाकीर हुसैन यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवू नका, अशी विनंतीही सर्वांना केली. 

कोण आहेत उस्ताद झाकीर हुसैन? 

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन प्रसिद्ध तबलावादक अल्ला रखा खाँ यांचे पुत्र. जाकिर हुसैन यांनी वयाच्या सातव्या वर्षी तबल्यावर पहिली थाप मारली आणि तिथूनच त्यांच्या प्रशिक्षणाची सुरुवात झाली. त्यानंतर वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी देशभरात आपली कला सादर करण्यास सुरुवात केली. झाकीर हुसैन यांना 1988  मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते. 

झाकीर हुसेन यांना 1990 मध्ये संगीताचा सर्वोच्च सन्मान 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार'ही मिळाला आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांना त्यांच्या कारकिर्दीत 7 वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाली, त्यापैकी त्यांनी चार वेळा पुरस्कारावर नाव कोरलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cold Wave Mahararashtra: राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे  किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप : नरेंद्र भोंडेकर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cabinet Expansion Special Report : फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 45% यंग ब्रिगेडSpecial Report Opposition Party Vs Mahayuti : विरोधकांचा सरकारवर आरोप, चहापानावर बहिष्कारMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cold Wave Mahararashtra: राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे  किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप : नरेंद्र भोंडेकर
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
Shivsena : एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास ते अडीच वर्षांच्या मंत्रिपदाची अट, शिवसेनेच्या 11 मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर सही
शिवसेनेच्या सर्व मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी, अडीच वर्षांच्या अटीसह प्रमुख मुद्दे कोणते?
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
Chhagan Bhujbal : ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, समर्थकांनी टायर जाळले
ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं शपथविधी सोहळ्याकडे पाठ
Embed widget