एक्स्प्लोर

Bhool Bhulaiyaa Marathi Natak: रंगभूमीवर अनोखा प्रयोग 'भुल भुलैय्या'; कुमार सोहोनी यांचं 125वं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला

Bhool Bhulaiyaa Marathi Natak: तब्बल 53 वर्षांची अखंड नाट्यसेवा आणि 125 नाट्यकृतींचा समृद्ध अनुभव पाठीशी असलेल्या सोहोनी यांनी 'भुल भुलैय्या' या नव्या नाटकाद्वारे एक वेगळी दिशा शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

Bhool Bhulaiyaa Marathi Natak: नाट्य दिग्दर्शन क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे कुमार सोहोनी... त्यांच्या प्रदीर्घ नाट्य कारकिर्दीकडे पाहिलं तर ती सतत प्रयोगशील राहणाऱ्या नाट्य प्रयोगशाळेसारखीच वाटते. नवनवीन संहितांचा शोध, नवोदित कलाकारांना संधी आणि सादरीकरणात सातत्याने वैविध्य आणण्याची त्यांची दृष्टी नेहमीच प्रकर्षाने दिसून येते. अशा या प्रयोगशील दिग्दर्शकाच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचं 125वं नाटक… 'भुल भुलैय्या'.  

तब्बल 53 वर्षांची अखंड नाट्यसेवा आणि 125 नाट्यकृतींचा समृद्ध अनुभव पाठीशी असलेल्या सोहोनी यांनी 'भुल भुलैय्या' या नव्या नाटकाद्वारे एक वेगळी दिशा शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

'भुल भुलैय्या' नाटकाचे निर्माते असलेले केदार सामंत आणि रणजीत देसाई हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील असून 'बाबा वर्दम थिएटर्स' या हौशी नाट्य संस्थेशी गेली अनेक वर्षे जोडलेले आहेत. ही संस्था 54 वर्षांपासून हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत आहे. या संस्थेमार्फत दोघेही गेली 28 वर्षे नाट्यक्षेत्रात सक्रिय आहेत. राज्यभरातील कलाकारांना व्यावसायिक रंगभूमीवर संधी मिळावी या हेतूने त्यांनी 'श्री लक्ष्मीनारायण प्रॉडक्शन्स'ची स्थापना केली. केदार सामंत यांनी 13 नाटकं, 6 बालनाट्य आणि 6 एकांकिकांचे दिग्दर्शन केलं असून अनेक नाटकांत अभिनय आणि तांत्रिक बाजू सांभाळली आहे. रणजीत देसाई यांनी नाटकांचं व्यवस्थापन आणि नाट्य महोत्सवांचं आयोजन केलं आहे.

'नाटकाची कथा ऐकल्यानंतरच हे नाटक करण्याचा मी निर्णय घेतल्याचे कुमार सोहोनी सांगतात. कथेत असा वेगळा गाभा होता की त्यावर नाटक होऊ शकतं, हे स्पष्ट जाणवलं आणि त्यामुळेच हा प्रयोग करण्याचं ठरवलं'. या नाटकाचा फॉर्म पारंपरिक चौकटींपेक्षा पूर्णतः वेगळा आहे. विज्ञान, वास्तुशास्त्र आणि तंत्र-मंत्र या तीनही घटकांच्या साह्याने ‘आत्म्याचा शोध’ घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे हे नाटक केवळ फॅण्टसी नसून, एक सखोल आणि विचारप्रवर्तक शोधयात्रा आहे. 

मराठी रंगभूमीवर अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच सादर होत असल्याचं कुमार सोहोनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आशय, मांडणी आणि सादरीकरण या तीनही स्तरांवर वेगळेपण जपणारे हे नाटक प्रेक्षकांना एक नवीन अनुभव देईल,असा विश्वास  यावेळी  नाटकाच्या टीमने व्यक्त केला.  कुमार सोहोनी यांचा हा प्रयत्न नक्कीच रसिकांच्या उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

'रंगत संगत'आणि 'श्री लक्ष्मीनारायण प्रॉडक्शन्स' निर्मित 'भुल भुलैय्या' नाटकाची कथा हेमंत एदलाबादकर यांची असून रंगावृत्ती, दिग्दर्शन, प्रकाश कुमार सोहोनी यांचे आहे. रणजित देसाई, केदार सामंत नाटकाचे निर्माते आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे, साहिल देसाई, परिणिता पावसकर, आरती सोळंकी, अमीर तडवळकर, आशुतोष घोरपडे, विजय सूर्यवंशी हे कलाकार नाटकात आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे  तर संगीत विजय गवंडे यांचे आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांनी केली आहे. सूत्रधार-विजय सूर्यवंशी आहेत. 

'भुल भुलैय्या' नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग 

रविवार 19 एप्रिल दुपारी 4 वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी
सोमवार 20 एप्रिल रात्री 8 वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे  
मंगळवारी 21 एप्रिल दुपारी 4 वाजता दीनानाथ नाट्यगृह, पार्ले 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pudhchya Shukrawari Saat Vaajta Marathi Play: सतीश राजवाडे-चैत्राली गुप्तेंचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; 'पुढच्या शुक्रवारी 7 वाजता'मधून झळकणार

महत्त्वाच्या बातम्या

Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget