आमीर-अलियाच्या रागामुळे तयार झाला नवा हॅशटॅग
आलिया आणि आमीर या दोघांनीही फोन पे या एपसाठी नवी जाहिरात केली आहे. या दोघांचा राग मनात धरून हे अॅपच अनइनस्टॉल करा असं सागणारा हॅशटॅग ट्विटरवर तयार झाला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काही विशिष्ट कलाकारांबद्दल कमालीचा द्वेष वाढतो आहे. सोशल मीडियावर हा राग दिसतो. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर हा राग वाढला. यात नेपोटिझमही होता. आऊटसायडर्सना मिळणारी वागणूकही होती. अलिया भटचं नाव यात पुढे होतंच. आता त्यात आमीर खानही आला आहे. या दोघांबद्दल असेलल्या रागाचं पर्यवसान नवा हॅशटॅग तयार होण्यात झाला आहे. तो हॅशटॅग आहे ##UninstallPhonePay
सुशांतसिंह प्रकरणात रिया चक्रवर्तीचं नाव आलं. त्याचवेळी रिया आणि महेश भट्ट यांच्यात झालेले मेसेजही व्हायरल झाले. सुशांतची गर्लफ्रेंड असलेली रिया महेश भट्ट यांच्याकडे जात असल्यामुळे सुशांतच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतंच. त्यात नेपोटिझमची भर पडली. अलिया भटबद्दल ही नाराजी होतीच. आता त्यात आमीरची भर पडली आहे. आमीर खान तुर्कीला चित्रिकरणासाटी गेला असताना तो तिथल्या राष्ट्राध्यक्षांना भेटल्याची नाराजी नेटकऱ्यांत आहे. काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर तुर्कीने या भारताच्या निर्णयाचा निषेध केला होता. तो राग अजून नेटकऱ्यांत आहे. आमीरने त्या राष्ट्रध्यक्षांचा पाहुणाचार स्वीकारल्याने ही मंडळी नाराज झाली आहे.
आता आलिया आणि आमीर या दोघांनीही फोन पे या एपसाठी नवी जाहिरात केली आहे. या दोघांचा राग मनात धरून हे अॅपच अनइनस्टॉल करा असं सागणारा हॅशटॅग ट्विटरवर तयार झाला आहे. अनेक लोक त्याचे वेगवेगळे मिम्स बनवून वापरू लागले आहेत. कलाकारांबद्दल असलेल्या रोषाचा असा फटका या अॅपला बसेल याचा विचारही संबंधित कंपनीने केला नसेल. यावर त्या कंपनीकडून कोणंतही अधिकृत उत्तर वा स्पष्टीकरण अद्याप आलेलं नाही.
SSR Suicide Case | रिया आणि तिच्या वडिलांना अद्याप सीबीआयचं समन्स नाही; रियाच्या वकीलांचं स्पष्टीकरण