चित्रा वाघ यांच्यानंतर आता रुपाली चाकणकर आक्रमक, उल्लू ॲपवरील अश्लिल 'हाऊस अरेस्ट'वर बंदीची मागणी!
Ullu app house arrest show : चित्रा वाघ यांच्यानंतर आता रुपाली चाकणकर आक्रमक झाल्या असून त्यांनी उल्लू ॲपवरील 'हाऊस अरेस्ट'वर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केलीये.

Ullu app house arrest show : उल्लू अॅपवरील (Ullu app) 'हाऊस अरेस्ट' (house arrest) या शो वर बंदी घालावी, या मागणीने जोर धरलाय. भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी या शो वर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) देखील आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी देखील या शो वर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत पत्र लिहिलंय.
उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रसारित होणाऱ्या हाउस अरेस्ट या शो मध्ये होस्ट एजाज खान सहभागी महिला,पुरुषांना अश्लील प्रश्न विचारून आक्षेपार्ह प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगत आहेत,महिलांना अंगावरील कपडे उतरविण्यास सांगून त्यासाठी प्रोत्साहन देत आहेत असे व्हिडियो समाज माध्यमातून… pic.twitter.com/bxRakWmEeF
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 2, 2025
रुपाली चाकणकर म्हणाल्या, उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रसारित होणाऱ्या हाउस अरेस्ट या शो मध्ये होस्ट एजाज खान सहभागी महिला,पुरुषांना अश्लील प्रश्न विचारून आक्षेपार्ह प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगत आहेत,महिलांना अंगावरील कपडे उतरविण्यास सांगून त्यासाठी प्रोत्साहन देत आहेत असे व्हिडियो समाज माध्यमातून समोर येत आहेत.याविषयी जनमानसातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने राज्य महिला आयोगाने याची स्वाधिकारे दखल घेतली आहे.हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण बंद करावे तसेच भारतीय न्याय संहिता,स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंध कायदा,माहिती प्रसारण कायदा व अनुषंगिक कायद्यान्वये संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना आयोगाने पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य यांना दिल्या आहेत.
रुपाली चाकणकर पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय अधिनियम, १९९३ अंतर्गत कलग १००(१) (क) (एक) व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्थिकारणे आणि त्या बाबीची स्वाधिकारे दखल घेणे बाकरीता प्राधिकृत करण्यात आले आहे.
उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हाऊस अरेस्ट हा शो प्रसारित होत आहे. या शोचे होस्ट एजाज खान सहभागी महिला, पुरुषांना अश्लील प्रश्न विचारुन आक्षेपार्ह प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगत आहेत, स्त्रीयांना अंगावरील कपडे उतरवण्यास प्रोत्साहन देत आहेत. असे व्हिडिओ समाज माध्यमातून समोर येत आहेत. याविषयी जनमानसातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने सदर प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्पाधिकारे दखल घेतली आहे.
प्रकरणी प्रसार माध्यगाव्दारे महिलांची प्रतिष्ठा व सन्मान दुखावेल असे अश्लिल व वादग्रस्त वित्रिकरण दाखवणे गंभीर स्वरुपाचे असून, सदर शोचे प्रसारण बंद करावे व संबंधितांवर बी.एन.एस व स्त्रीयांचे अश्लिल प्रदर्शन प्रतिबंधक कायदा १९८६ अंतर्गत तसेच महिती प्रसारण कायदा (IT Act, २०००) प्रमाणे सहभागी सर्वांवर न्यायांकित कार्यवाही व्हावी.
सदर हाऊस अरेस्ट या शोवर योग्य ती नियमानुसार कार्यवाही करावी. तसेच प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा बत्तुस्थितीदर्शक अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा १९९३ कलम १२(२) व १२८३ नुसार आयोगास तात्काळ mscwmahilaayog@gmail.com या ई-मेल वर तात्काळ पाठविण्यात यावी.
इतर महत्त्वाच्या बातम्या
उल्लू अॅपवर एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट शो' अश्लिलतेचा कळस, तात्काळ बंदी घाला, चित्रा वाघ यांची मागणी























