(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tunisha Sharma Death: 'मेन्स डे'ला ज्याचं भरभरुन कौतुक केलं, तोच मृत्यूचं कारण बनला? तुनिषानं शिझानवर लिहिलेली खास पोस्ट व्हायरल
Tunisha Sharma Death: अलीबाबा या मालिकेतील अभिनेता शिझान विरोधात तुनिषाच्या आईनं तक्रार दिली आहे. या प्रकरणात शिझानला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Tunisha Sharma Death: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. तिच्यासोबत मालिकेत काम करणारा शिझान खानसोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्या नैराश्यातून तिनं हे पाऊल उचललं आहे. शिझान खानला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे, असं सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरुन शिझानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ब्रेकदरम्यान तुनिषा टॉयलेटमध्ये गेली आणि बराच वेळ आली नाही, त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. यावेळी तुनिषाने गळफास घेतल्याचे आढळून आले. अलीबाबा या मालिकेतील अभिनेता शिझान विरोधात तुनिषाच्या आईनं तक्रार दिली आहे. या प्रकरणात शिझानला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अलीबाबा या मालिकेतील अभिनेता शिजान विरोधात तुनिषाच्या आईनं तक्रार दिली आहे. या प्रकरणात शिजानला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी शिजान आणि तुनिषा या दोघांनी एकत्र त्याच्या रूममध्ये जेवण केले. त्यानंतर शिजान हा सेटवर शूटिंगसाठी गेला आणि शिजानच्या रूममध्येच तिने आत्महत्या केली.
शिझान आणि तुनिषा अली बाबा मालिकेत सोबत होते. मेन्स डे दिवशी तुनिषाने शिझानचा फोटो शेअर केला होता आणि एक पोस्ट लिहिली होती ज्यात तुनिषानं शिझानचं भरभरुन कौतुक केलं होतं.
काय लिहिलंय त्या पोस्टमध्ये
मेन्स डे दिवशी लिहिलेल्या पोस्टमध्ये तुनिषानं म्हटलं आहे की, "मला अशा प्रकारे उंची गाठण्यास मदत करणाऱ्या माणसाला आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा! मी माझ्या आयुष्यात पाहिलेला सर्वात मेहनती, अत्यंत उत्साही आणि सर्वात देखणा माणूस! हा माझा सर्वात चांगला मित्र आहे. शिझान हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भाग आहे. एक माणूस आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी जे योगदान देतो आणि त्याग करतो ते ओळखण्याची आणि त्यांचा सन्मान करण्याची हीच वेळ आहे! आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!" अशी पोस्ट शिझानच्या फोटोसह तुनिषानं शेअर केली होती.
View this post on Instagram
आत्महत्या करण्याआधी काही तास तुनिषानं एक पोस्ट केली आहे. त्यात तिने लिहिले की, जे आपल्या आवडीसाठी जगतात, ते कधीच थांबत नाहीत.
ही बातमी देखील वाचा