एक्स्प्लोर

Highest Paid Indian Actors 2026: देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार

Highest Paid Indian Actors 2026: ना सलमान, ना शाहरुख अन् ना आमिर; 'हा' देशातला सर्वात महागडा सुपरस्टार, दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीही फक्त एक झलक पाहण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार होतात चाहते...

Highest Paid Indian Actors 2026: जेव्हा केव्हा फिल्म इंडस्ट्रीतल्या (Film Industry) महागड्या स्टार्सची (Expensive Stars) चर्चा रंगते, तेव्हा सर्वांच्या तोंडी शाहरुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) हीच नावं येतात. आजही फिल्म इंडस्ट्री तीन दिग्गज खान्सभोवती फिरते, असाच समज सर्वांचा आहे. पण, तुम्हाला एक गंमत माहितीय का? देशातला सर्वात महागडा स्टार (India's Most Expensive Star) या तिनही स्टार्सपैकी एकही नाही. तर, हीच चर्चा साऊथ इंडस्ट्रीकडे (South Film Industry) वळवली, तर सर्वात आधी नाव येतं, रजनीकांत (Rajinikanth). पण, 2026 मधल्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत यापैकी कोणाचंही नाव पहिल्या क्रमांकावर नाही. आम्ही भारतातील ज्या सर्वात महागड्या स्टारबाबत सांगतोय, तो बॉलिवूडचा नाही, तो आहे साऊथचा. हा अभिनेता गेल्या दोन वर्षांपासून एकाही सिनेमात दिसलेला नाही. पण, तरिसुद्धा त्याची क्रेझ कायम आहे. 

आम्ही ज्या अभिनेत्याबाबत सांगतोय, तो दुसरा-तिसरा कुणीच नसून आपल्या सर्वांचा लाडका भाऊ 'पुष्पा'... म्हणजेच, साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (South Superstar Allu Arjun). बॉलिवूड (Bollywood News) असो वा टॉलिवूड (Tollywood News), भारतीय सिनेसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आहे. त्यानं आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान आणि रजनीकांत यांसारख्या दिग्गजांनाही मागे टाकलं आहे. हा दावा उगाच कुणी करत नाही, तर IMDb च्या एका अहवालातून समोर आलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

एका सिनेमासाठी अल्लू अर्जुन किती मानधन घेतो? (How Much Allu Arjun Charge For Movie?)

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या एका सिनेमाच्या मानधनाबद्दल बोलायचं झाल्यास, IMDb च्या अहवालानुसार, हा अभिनेता 200 ते 300 कोटी रुपयांचं मानधन घेतो. तो शेवटचा 'पुष्पा' फ्रँचायझीमध्ये दिसला होता. ज्यामध्ये Pushpa: The Rise (पार्ट 1) आणि Pushpa: The Rule (भाग 2) या सिनेमांचा समावेश आहे. ही फ्रँचायझी भारतीय सिनेसृष्टीत प्रचंड यशस्वी ठरली आहे. IMDb च्या माहितीनुसार, 'पुष्पा' सीरिजमधील दोन्ही सिनेमांचं एकूण (Gross) कलेक्शन 2,092.20 कोटी रुपयां इतकं आहे. ज्यामध्ये पहिल्या सिनेमानं 350.10 कोटी रुपये आणि दुसऱ्या पार्टनं 1,742.10 कोटी रुपयांची कमाई केली. Dhoom आणि Baahubali या फ्रँचायझींनंतर, भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारी तिसरी फ्रँचायझी म्हणून या फ्रँचायझीचा क्रमांक लागतो.

सर्वाधिक फी घेणारे भारतातील TOP 5 सुपरस्टार्स (Top 5 Highest-Paid Superstars in India)

  • अल्लू अर्जुन : 200-300 कोटी
  • थलापति विजय : 150-275 कोटी
  • आमिर खान : 100-275 कोटी
  • रजनीकांत : 125-270 कोटी
  • शाहरुख खान : 150-250 कोटी
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sun Pictures (@sunpictures)

अल्लू अर्जुनची अपकमिंग फिल्म (Allu Arjun's Upcoming Film)

अल्लू अर्जुनच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबाबत बोलायचं झाल्यास, सध्या अल्लू अर्जुन अॅटली कुमार यांच्या 'राका' (Raaka) सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जान्हवी कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चाहते या सिनेमाच्या प्रदर्शनाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. नुकतंच त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या सिनेमाचा 'फर्स्ट लूक' पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. आपल्या लाडक्या स्टारच्या आगामी सिनेमाचा लूक पाहून चाहते त्याच्या आगामी सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Godfather Fame Actor Al Pacino Life Story: 85 वर्षांचा सुपरस्टार, 32 वर्षांची गर्लफ्रेंड अन् दोन वर्षांचा मुलगा; सिनेसृष्टीच्या 'गॉडफादर'चे अफेअर्सही सतराशे साठ, ओळखलं का कोण?

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget