एक्स्प्लोर

Toofaan Teaser: अज्जू भाईपासून 'तूफान' होण्यापर्यंतच्या प्रवासाची एक झलक प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याची मुख्य भूमिका असणाऱ्या 'तूफान' या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अवघ्या काही मिनिटांच्या या टीझरमध्ये चित्रपटाच्या दमदार कथानकाची एक झलक पाहायला मिळत आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ यांच्या वतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून तूफान या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित तूफान या चित्रपटामध्ये अभिनेता फरहान अख्तर हा मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. तर, मृणाल ठाकूर, सुप्रिया पाठक शाह, हुसैन दलाल आणि परेश रावत यांसारखी तगडी स्टारकास्टही चित्रपटातून झळकणार आहे. 

अज्जू भाई या एका व्यक्तीच्या जीवनप्रवासावर आणि तो 'तूफान' म्हणून ओळखला जाईपर्यंतच्या वाटचालीवर चित्रपटातून भाष्य करण्यात येणार आहे, ज्याची एक लहानशी झलक टीझरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 

जिथं जाऊ तिथं वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या, हाणामारी करणाऱ्या अज्जू भाईचा एक निर्णय़ त्याला बॉक्सिंगच्या वर्तुळात आणून सोडतो. त्याच्या प्रेयसीच्या रुपात दिसणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि प्रशिक्षकांच्या रुपात दिसणारे अभिनेते परेश रावल यांच्या भूमिका पाहता हा चित्रपट आतापासूनच प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर टाकताना दिसत आहे. 

बॉम्बे बेगम'समोरच्या अडचणी वाढल्या सीरिज थांबवण्याची बालहक्क आयोगाची मागणी

चित्रपटात्या नावाप्रमाणंच भूमिकेला योग्य तो न्याय देण्यासाठी अभिनेता फरहान अख्तर यानं घेतलेली मेहनत त्यानं साकारेलल्या अज्जू भाई, 'तूफान' या भूमिकेची झलक पाहताना लगेचच कळून येते. त्यातच सहाय्यक भूमिकेत असणाऱ्या कलाकारांनी मध्यवर्ती भूमिकेला दिलेली साथ ही घडी आणखी नीट बसवून जाते. या चित्रपटाच्या निमत्तानं फरहान आणि मृणाल यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 

21 मे या दिवशी हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमच्या माध्यमातून 240हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. रितेश सिधवानी,  राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं 'भाग मिल्खा भाग' या गाजलेल्या चित्रपटानंतर फरहान आणि राकेश ओमप्रकाश मेहरा हे तब्बल सात वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. त्यामुळं या चित्रपटाकडून प्रेक्षक आणि समीक्षकांनी बऱ्याच अपेक्षा ठेवल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget