'लाखों दिलोंकी धडकन' किर्ती सुरेश लग्न करणार, तारीखही आली समोर; नवरोबा आहे तरी कोण?
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री किर्ती सुरेश लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. विशेष म्हणजे तिच्या लग्नाची तारीखही ठरली आहे.
Kirthee Suresh Confirm Wedding With Antony Thattil: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री किर्ती सुरेश ही अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार किर्ती तिचा बॉयफ्रएंड अँटोनी थाटील याच्यासोबतच लग्न करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघेही रिलेशनमध्ये आहेत. त्यानंतर आता या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. आगामी महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2024 मध्ये ते विवाहबद्ध होणार असल्याचं म्हटलं जातंय.
डिसेंबरमध्ये लग्न होण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार खुद्द किर्ती सुरेशनेच तिच्या लग्नाबाबत माहिती दिलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार किर्ती सुरेश नुकतेच तिच्या कुटुंबीयांसोबत आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिरात दर्शनासाठी गेली होती. यावेळी पापाराजींच्या काही प्रश्नांची तिने उत्तरं दिली. यावेळी किर्ती सुरेशने ती लाँग टाईम बॉयफ्रेंड अँटोनीसोबत लग्न करणार असल्याचं सांगितलं. डिसेंबर 2024 मध्ये ते लग्न करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांचं लग्न गोव्यात होणार असल्याचं समजतंय.
11 किंवा 12 डिसेंबर रोजी लग्न होणार?
तिच्या लग्नाबाबत बोलताना किर्ती सुरेश म्हणाली की, “आगामी महिन्यात माझं लग्न आहे. त्यासाठी मी श्रीवरू यांच्या दर्शनाला आली आहे. आमचं लग्न गोव्याला होणार आहे," किर्ती सुरेशचं लग्न डिसेंबर महिन्यात गोव्याला होणार असलं तरी तिच्या लग्नाची नेमकी तारीख पुढे आलेली नाही. मात्र तिचं लग्न डिसेंबर महिन्यातील 11 किंवा 12 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. तिच्या जवळच्या नातेवाईकांत हा विवाहसोहळा संपन्न होईल.
नोव्हेंबर महिन्यात पोस्ट केला होता फोटो
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला किर्ती सुरेशने अँटोनीसोबतचा एक फोटो सार्वजनिक केला होता. या फोटोला तिने दिलेलं कॅप्शनही अगदी खास होतं. 15 वर्षे झाली. अजूनही दिवसांची मोजणी चालूच आहे. ही दिवसांची मोजणी भविष्यातही चालूच राहील, असं तिनं म्हटलं होतं.
किर्ती सुरेशचा येतोय नवा चित्रपट
दरम्यान, किर्ती सुरेशचा बॉयफ्रेंड अँटोनी हे एक उद्योजक आहेत. कोचीमध्ये त्याचे अनेक रिसॉर्ट्स आहेत. चेन्नई या शहरातही अँटोनी यांचे काही उद्योग आहेत. किर्ती सुरेश लवकरच एका चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. अभिनेता वरुण धवनसोबत तिचा बेबी जॉन हा चित्रपट येतोय. 25 डिसेंबर 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
प्रिया नागराजचा प्रतिमाला खल्लास करण्याचा प्लॅन, भूतकाळ आठवल्यानं 'ठरलं तर मग' मालिकेत नवा ट्विस्ट
बेडरूममध्ये बोलवत जबरदस्ती ,अश्लील मेसेज..बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल