Sai Dharam Tej : टॉलिवूड अभिनेता साई धरम तेजचा अपघात, सध्या प्रकृत्ती स्थिर
Sai Dharam Tej Accident: टॉलिवूडचा अभिनेता साई धरम तेजचा शुक्रवारी रात्री अपघात झाला. रस्त्यावरील चिखलामध्ये त्याची बाईक घसरल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय.
Sai Dharam Tej Accident : टॉलिवूडचा अभिनेता साई धरम तेज याचा शुक्रवारी रात्री अपघात झाला. हा अपघात रात्री 8.30 च्या सुमारास चेन्नईच्या दुर्गमचेरुवु केबल ब्रिजच्या जवळ झाला. साई धरम तेज स्पोर्ट्स बाईक चालवत होता. रस्त्यावरील चिखलामध्ये त्याची बाईक घसरली आणि अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
साई धरम तेजने बाईक चालवताना हेल्मेट घातले होते तसेच त्याने दारुचे सेवनही केले नव्हते असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. रस्त्यावरील चिखलामध्ये बाईक घसरल्याने हा अपघात झाल्याचं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केल. साई धरम तेजचा अपघात झाल्यानंतर त्याला तातडीने चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं.
द हिंदू या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, साई धरम तेजच्या डोक्याला, छातीला आणि हाताला मोठा मार लागला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृत्ती स्थिर असल्याचं साई धरम तेजच्या टीमच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. सुपरस्टार पवण कल्याणने अपोलो हॉस्पिटलला भेट दिली असून साई धरम तेजच्या तब्येतीची चौकशी केली आहे.
Official Communication - @IamSaiDharamTej is absolutely fine and recovering. Nothing to worry. He is under precautionary care in hospital.
— SKN (Sreenivasa Kumar) (@SKNonline) September 10, 2021
साई धमर तेज हा सुपरस्टार चिरंजीवीचा भाचा असून पवन कल्याणचा पुतण्या आहे. साई धरम तेजच्या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. एका व्हायरल फोटोमध्ये साई धरम तेजच्या डोक्याला आणि इतर ठिकाणी मार लागल्याचं स्पष्ट दिसतंय.
.@IamSaiDharamTej#SaiDharamTej was wearing helmet & was not drinking alcohol. His bike skid due to mud on the road. He is out of danger & is currently receiving treatment. : Madhapur Police Statement pic.twitter.com/0Q9BAmB3Fk
— SKN (Sreenivasa Kumar) (@SKNonline) September 10, 2021
संबंधित बातम्या :
- 'जेठालाल'ची क्रश 'बबिता जी' 9 वर्षाने लहान 'टप्पू'च्या प्रेमात! मुनमुन दत्ता आणि राज अनादकत रिलेशनशिपमध्ये!
- Sourav Ganguly Biopic: मोठ्या पडद्यावर लवकरच उलगडणार सौरव गांगुलीचा जीवनप्रवास, गांगुलीकडून चित्रपटाची घोषणा
- कंगना रनौतला हायकोर्टाचा दणका, जावेद अख्तर प्रकरणी अंधेरी दंडाधिकारी कोर्टाची कारवाई योग्यच