एक्स्प्लोर

Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding : नाशिक कावडी meets कोकणी बँजो, तितिक्षा-सिद्धार्थच्या संगीत सोहळ्याचा धम्माल व्हिडिओ

Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding : नुकतच अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ तावडे हे लग्नबंधात अडकले आहेत.

 Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding :   कलाविश्वातली लगीनसराई मागील काही दिवसांपासून सुरु आहे. नुकतच अभिनेत्री तितिक्षा तावडे ( Titeeksha Tawde) आणि सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) हे लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाच्या, हळदीच्या व्हिडिओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. त्यांच्या चाहत्यांच्या देखील लग्नाचे फोटो पसंतीस उतरले. तितिक्षा आणि सिद्धार्थ या दोघांनी 26 फेब्रुवारी रोजी कुटुंब आणि नातेवाईकांसह लग्नगाठ बांधली. नुकतच त्यांनी त्यांच्या संगीत सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. 

तितिक्षा आणि सिद्धार्थने त्यांच्या केळवणाचा फोटो शेअर करत त्यांच्या लग्नाची बातमी दिली होती. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांना देखील सुखद धक्का मिळाला. काही दिवसांपूर्वी तितिक्षा आणि सिद्धार्थच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आणि त्यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली. सिद्धार्थने नुकतच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांच्य संगीत सोहळ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

 नाशिक कावडी meets कोकणी बँजो

सिद्धार्थने हा व्हिडिओ शेअर करत त्याला हटके कॅप्शनही दिलं आहे. When नाशिक कावडी meets कोकणी बँजो, असं कॅप्शन सिद्धार्थने या व्हिडिओला दिलं आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ आणि तितिक्षाने त्यांच्या संगीत सोहळ्यात धम्माल डान्स केल्याचं देखील पाहायला मिळालं. तसेच त्यांच्या मित्रमंडळींनी देखील ठेका धरला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. तितिक्षानेही त्यांच्या संगीत सोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Siddharth Bodke (@siddharthbodkeofficial)

तितिक्षा आणि सिद्धार्थचा लग्नसोहळा

तितिक्षा आणि सिद्धार्थने त्यांच्या लग्नासाठी पेस्टल करलची निवड केली होती. तितिक्षाने ऑफ व्हाईट आणि गोल्डन किनार असलेली नऊवारी नेसली होती, तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट कलरचा कुर्ता आणि गोल्डन रंगाचं धोतरं घातलं होतं. त्यांच्या लग्नाच्या या लूकने देखील साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ळद, साखरपुडा, संगीत असे सगळे कार्यक्रम पार पडले. त्यानंतर ही जोडी विवाहबंधनात अडकली. 

तितिक्षा आणि सिद्धार्थची लव्हस्टोरी (Titeeksha Tawde Siddharth Bodke Lovestory)

तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके 'तू अशी जवळी रहा' ही मालिका करत होते. या मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे मालिका संपली पण त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते रिलेशनमध्ये आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

तितीक्षाने सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर सिद्धार्थचा 'श्रीदेवी प्रसन्न' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याआधी तो 'दृश्यम 2' या बॉलिवूडपटात झळकला होता. 

ही बातमी वाचा : 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Sunil Kedar: सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Embed widget