Ganapath Teaser : टायगर श्रॉफ पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये; 'गणपत' चित्रपटाचा टीझर रिलीज
Ganapath Teaser : नुकतंच टायगर श्रॉफने 'गणपत' या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Ganapath Teaser : बॉलिवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ (Tiger Shroff) लवकरच 'गणपत' (Ganapath Movie) चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार आहे. टायगरने या चित्रपटाचा टीझर नुकतंच सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जबरदस्त अॅक्शन करताना दिसतोय. सोशल मीडियावर अपलोड होताच या टीझरने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.
टायगरने रिलीज केला 'गणपत'चा टीझर
View this post on Instagram
चित्रपटाचा हा धमाकेदार टीझर शेअर करताना, टायगर श्रॉफने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'ज्या जगात दहशतवादाचं राज्य आहे, तिथे गणपत येतोय, माझ्या लोकांचा आवाज बनण्यासाठी मी येतोय."
'या' दिवशी येणार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
जबरदस्त अॅक्शनने भरलेला 'गणपत' हा चित्रपट येत्या 20 ऑक्टोबर 2023 ला म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. बऱ्याच काळानंतर टायगर मोठ्या पडद्यावर दिसरणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये देखील प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
टीझर पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया
टीझरवरुन असं दिसतंय की हा एक अॅक्शनपट सिनेमा असणार आहे. टायगर यामध्ये पुन्हा एकदा अॅक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझर पाहून चाहत्यांनी चित्रपटाचंच नाही तर, टायगरच्या शरीरयष्टीचंही (बॉडी) कौतुक केलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले की, 'अखेर आमची प्रतीक्षा संपली.' तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, 'टायगर इज बॅक'. तर, आणखी एका चाहत्याने लिहिले की, 'तुला पुन्हा एकदा अॅक्शन हिरोच्या रुपात पाहण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत.' या व्हिडीओला आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.
क्रिती सेननबरोबर दिसणार टायगर
टायगरचा हा चित्रपट देखील एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात तो क्रिती सेननबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. या दोघांची जोडी 'हिरोपंती' चित्रपटातही दिसली होती. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. याशिवाय टायगर 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्येही दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये खिलाडी अक्षय कुमारबरोबर टायगर स्क्रीन शेअर करणार आहे. टायगरचे चाहते मात्र त्याच्या दोन्ही चित्रपटांबद्दल खूप उत्सुक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :