Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफच्या टीमने मौन सोडलं, पहिली प्रतिक्रिया देत दिला थेट इशारा, पोस्ट शेअर करत काय म्हणाले?
Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफ हल्ल्याप्रकरणात टीमकडून प्रतिक्रिया;थेट इशारा दिला, पोस्ट शेअर करत नेमकं काय म्हणाले?

Tiger Shroff Attack Case: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या (tiger Shroff) चारचाकीवर 18 ऑक्टोबर रोजी हल्ला झाला. काही आरोपींनी मिळून अभिनेत्यावर हल्ला करण्याचा कट रचला. या प्रकरणी पोलिसांना (Mumbai Police) अनेक धागेदोरे सापडत आहेत. पोलीस देखील टायगर श्रॉफ प्रकरणी अॅक्शन मोडमध्ये आली आहे. टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात आता अभिनेत्याच्या टीमकडून पहिले निवेदन जारी करण्यात आले आहे. टायगर श्रॉफच्या टीमने AI जनरेटेड कंटेट पसरवण्याविरोधात इशारा दिला आहे. अभिनेत्याच्या टीमची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. टायगर श्रॉफच्या टीमकडून जारी करण्यात आलेली पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
टायगर श्रॉफच्या टीमने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये टीमने खोट्या किंवा एआय जनरेटेड बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं. टीमने या पोस्टद्वारे स्पष्ट केलं की, टायगर श्रॉफने अद्याप हल्ल्यासंदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. अथवा त्याने कोणतेही अद्याप निवेदन जारी केलेले नाही. या घटनेच्या किंवा अभिनेत्याच्या संबंधित, जर कोणतीही खोटी माहिती पसरवण्यात आली, तर त्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असं अभिनेतेच्या टीमने स्पष्ट केलं.
टायगर श्रॉफच्या टीमने ही पोस्ट आता करण्यामागचं कारण म्हणजे, सध्या अनेक सोशल मीडिया अकाऊंट्सवर दिशाभूल करणाऱ्या बातम्यांमुळे गोंधळ उडाला आहे. टायगर श्रॉफच्या टीमने लोकांना केवळ अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवण्याची विनंती केली आहे. कोणत्याही कंटेटवर सत्यता पडताळण्याशिवाय विश्वास ठेवू नये, असंही टायगर श्रॉफच्या टीमने म्हटलं आहे. अभिनेत्याच्या टीमने पोस्टमधून हे देखील स्पष्ट केलं की, टायगर श्रॉफने अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन किंवा व्हिडीओ जारी केलेलं नाही. सध्या टायगर श्रॉफच्या टीमने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
18 ऑक्टोबर रविवारी सायंकाळच्या सुमारास त्याच्यावर गोळीबाराची घटना घडली (Tiger Shroff Attack Case Tiger Shroff Team shares post on Instagram)
मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफवर 18 ऑक्टोबर, रविवारी हल्ला घडला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तीन आरोपींच्या कोटा येथून मुसक्या आवळल्या आहेत. सुदैवाने टायगर श्रॉफला या प्रकरणी गंभीर दुखापत झालेली नाही. दरम्यान, त्याचा ड्रायव्हर आणि एका चाहत्यावर गोळीबाराचा प्रकार घडला. सध्या दोघांवरही उपचार सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























