मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या तपासावरून मुंबई पोलिसांवर सातत्याने संशयाची सुई रोखली जाते आहे. आज मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आज आपला तपास योग्य चालला असल्याचं म्हटलं आहे. पण त्याचवेळी या सुशांत प्रकरणाचा समारोप करा, अशी विनंती दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केली आहे.



हे त्यांचं ट्वीट.. 




'आता बास्स झालं.. @MumbaiPolice तुम्ही आमची शान आहात. सतत तुमच्या विषयी negative बातम्या सुरू आहेत. कुणीही येतय आणि टिकली वाजवून जातय. तोंडावर त्यांना पुरावे देऊन या #SushantSinghRajputDeathCase प्रकरणाचा समारोप करा!!!! तुमच्यावर आम्हाला गर्व आहे. @CMOMaharashtra'


हे ट्वीट आहे दिग्दर्शक केदार शिंदे यांचं.  केदार शिंदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. त्यांनी केलेल्या नाटकांनी, सिनेमांनी मोठं रंजन केलं आहे. सही रे सही, लोच्या झाला रे, श्रीमंत दामोदरपंत आदी नाटकांसह अगंबाई अरेच्चा, ऑनड्युटी चोविस तास, जत्रा आदी अनेक सिनेमे त्यांनी केले. अर्थात त्या पलिकडे केदार शिंदे आपली मतं नेहमीच चोखपणे मांडत असतात. त्यांच्या या नव्या ट्वीटमुळे त्यांनी जनसामान्यांच्या मनात असलेल्या भावनांना वाट करून दिली आहे.


सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा गुंता वाढतो आहे. एकिकडे मुंबई पोलीस तपास करत असतानाच या तपासावर अविश्वास दाखवत सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांत रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. यामुळे सुशांतच्या चाहत्यांमध्ये मुंबई पोलिसांबद्दल रोशाची भावना आहे. सुशांतच्या कुटुंबियांनीच हे सांगितल्याने संपूर्ण उत्तर भारतीय मंडळी मुंबई पोलिसांच्या नावाने बोटं मोडू लागले आहेत. पण अशावेळी मुंबई पोलीस मात्र गप्प आहेत. त्यांच्याकडून काहीच स्टेटमेंट आलेलं नाही.




केवळ मुंबई पोलीस नव्हे, तर शिवसेनेच्या एका नेत्याचाही या प्रकरणात जवळचा संबंध असल्याचा आरोप काही माध्यमांतून होतो आहे. गेले अनेक दिवस हा प्रकार सुरु असतानाही त्यावर काही बोललं जात नाहीय. त्याबद्दल केदार शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अर्थात मुंबई पोलिसांची बाजू आज कमिशनर यांनी मांडलीच. पण या तपासाभवतीचं शंकेचा घेरा काही कमी व्हायचं नाव घेत नाहीय. मुंबई पोलिसांच्या तपास आणि इतरत्र आलेले राजपूत कुटुंबियाचं बाईटस यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुंबई पोलिसांनी आता तातडीने पुढाकार घेऊन सर्व प्रश्नांना उतर द्यायला हवं आणि या सुशांत प्रकरणाचा समारोप करावा अशी केदार शिंदे यांची अपेक्षा अत्यंत रास्त आहे.


महत्त्वाच्या बातम्या :