Bharat Jadhav: "विचार करायला लावणारा विषय"; भरत जाधवच्या अस्तित्व नाटकाचं प्रेक्षक करतायत भरभरुन कौतुक
Bharat Jadhav: अभिनेता भरत जाधवनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये 'अस्तित्व' या नाटकाचं प्रेक्षक भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत.
Bharat Jadhav: भरत जाधव एण्टरटेनमेंट निर्मित 'अस्तित्व' (Astitva) हे नाटक गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकामध्ये चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर आणि भरत जाधव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या पुणे, मुंबई, ठाणे येथे अस्तित्व या नाटकाचे प्रयोग होत आहेत. नुकताच अभिनेता भरत जाधवनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये 'अस्तित्व' या नाटकाचं प्रेक्षक भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत.
प्रेक्षकांनी केलं नाटकाचं कौतुक
भरत जावधनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की नाटक पाहिल्यानंतर एक प्रेक्षक म्हणतो, "आम्ही सुन्न होऊन नाट्यगृहाच्या बाहेर आलो आहोत. हा विचार करायला लावणारा विषय आहे." तर दुसरा प्रेक्षक म्हणतो, "माणसाची वेगवेगळी स्वप्न असतात आणि ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणूस झगडत असतो. हे या नाटकात अगदी सुंदर पद्धतीनं दाखवण्यात आलेलं आहे." प्रेक्षकांचा हा प्रतिसाद पाहिल्यानंतर असं लक्षात येत आहे की, भरतच्या इतर नाटकांप्रमाणेच या नाटकाचे प्रयोग देखील हाऊसफुल होणार आहेत.
View this post on Instagram
अजिंक्य देवनं देखील केलं कौतुक
अजिंक्य देवनं देखील भरतचं 'अस्तित्व' हे नाटक पाहिलं आहे. नाटक पाहिल्यानंतर तो म्हणाला, "मी अस्तित्व नाटक पाहून भारावलो आहे. या नाटकात अत्यंत चांगले डायलॉग्स आहेत. कलाकारांनी उत्कृष्ट काम केलं आहे. भरत हा विनोदाचा बादशाह आहे, पण या नाटकामध्ये त्याचा अभिनय पाहून डोळ्यात पाणी येतं. भरत जाधव सीरिअस काम कसं करेल? असं अनेकांना वाटत असेल. पण या नाटकामधून भरत चांगला कलाकार आहे, हे सिद्ध होतं. भरतनं खूप चांगलं काम केलं आहे. हे नाटक नक्की बघा"
स्वप्निल जाधव लिखित दिग्दर्शित 'अस्तित्व' हे दोन अंकी नाटक सध्या रंगमंच गाजवत आहे. "अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व", अशी या नाटकाची टॅग लाईन आहे. डिसेंबर महिन्यात विविध ठिकाणी या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. 2 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजता विष्णुदास भावे, वाशी येथे या नाटकाचा प्रयोग होणार आहेत. तसेच काशिनाथ नाट्यगृह, ठाणे, महाकवी कालिदास कला मंदिर, नाशिक, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे देखील या नाटाकचे प्रयोग होणार आहेत.
संंबंधित बातम्या: