Theatre Releases This Week: थिएटरमध्ये साऊथ सिनेमांचा महाधुमाकूळ! एकाच आठवड्यात तीन महानायक एकमेकांना भिडणार; बॉक्स ऑफिसवर चुरस रंगणार
Theatre Releases This Week: थिएटरमध्ये साऊथ सिनेमांचा महाधुमाकूळ! एकाच आठवड्यात तीन महानायक एकमेकांना भिडणार; बॉक्स ऑफिसवर चुरस रंगणार

Theatre Releases This Week: या आठवड्यात सिनेरसिकांसाठी मोठी मेजवानी आहे. थिएटरमध्ये एकामागोमाग एक दमदार चित्रपट रिलीज होत असून बॉक्स ऑफिसवर साऊथ सिनेमाचं वर्चस्व पाहायला मिळणार आहे. प्रभास, विजय थलापती आणि शिवकार्तिकेयन हे तीन दिग्गज स्टार्स एकाच आठवड्यात प्रेक्षकांसमोर येत असल्याने रंगतदार चुरस निर्माण झाली आहे. याशिवाय प्रादेशिक आणि हॉलीवूड चित्रपटही मोठ्या पडद्यावर दाखल होत आहेत.
द राजा साब
साऊथ सुपरस्टार प्रभासची बहुचर्चित फिल्म ‘द राजा साब’ या आठवड्यात रिलीजसाठी सज्ज आहे.ही एक हॉरर-कॉमेडी फिल्म असून मारुती यांनी दिग्दर्शन केलं आहे. प्रभासचा वेगळ्या अंदाजातील अवतार पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
रिलीज डेट: 9 जानेवारी 2026
जन नायकन
विजय थलापतीच्या करिअरमधील शेवटची फिल्म म्हणून ‘जन नायकन’ कडे पाहिलं जात आहे.या चित्रपटात बॉबी देओल आणि पूजा हेगडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.हिंदीत हा चित्रपट ‘जन नेता’ या नावाने रिलीज होणार आहे.
रिलीज डेट: 9 जानेवारी 2026
पराशक्ति
1965 च्या हिंदीविरोधी आंदोलनावर आधारित ‘पराशक्ति’ या चित्रपटात शिवकार्तिकेयन मुख्य भूमिकेत आहे.सुधा कोंगारा दिग्दर्शित या चित्रपटात रवि मोहन, अथर्वा आणि श्रीलीला यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
रिलीज डेट: 10 जानेवारी 2026
लालो कृष्ण सदा सहायते
गुजराती सिनेमातील सुपरहिट ठरलेला ‘लालो कृष्ण सदा सहायते’ आता हिंदीमध्ये रिलीज होत आहे.गेल्या वर्षी प्रचंड यश मिळाल्यानंतर हा चित्रपट हिंदी प्रेक्षकांसाठी पुन्हा थिएटरमध्ये येतोय.
रिलीज डेट: 9 जानेवारी 2026
ग्रीनलँड 2: माइग्रेशन
हॉलीवूडचा पोस्ट-अपोकॅलिप्टिक सर्व्हायवल थ्रिलर ‘ग्रीनलँड 2: माइग्रेशन’ देखील या आठवड्यात रिलीज होतोय.रिक रोमन वॉ दिग्दर्शित या चित्रपटात जेरार्ड बटलर प्रमुख भूमिकेत आहे.
रिलीज डेट: 9 जानेवारी 2026
द क्रोनोलॉजी ऑफ वॉटर
क्रिस्टन स्टीवर्ट दिग्दर्शित ‘द क्रोनोलॉजी ऑफ वॉटर’ ही रोमँटिक ड्रामा फिल्म लिडिया युकनविच यांच्या आत्मकथनावर आधारित आहे.इमोजेन पूट्स मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
रिलीज डेट: 9 जानेवारी 2026
एकूणच, हा आठवडा सिनेप्रेमींसाठी धमाकेदार ठरणार असून थिएटर फुल्ल राहण्याची दाट शक्यताय.























