Chehre Box Office Collection: अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या 'चेहरे'ने प्रेक्षक निराश, पहिल्या दिवशीची कमाई वाचा..
चेहरे चित्रपट देशातील 1000 स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाला दिल्लीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे इतर राज्यात म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.
मुंबई : अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट बॉक्स ऑफिवर रिलीझ झाला आहे. परंतु या चित्रपटाला चाहत्यांकडून खास प्रतिसाद मिळालेला नाही. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
चेहरे चित्रपटाने पहिल्या दिवशी 60 लाख रुपयांचे कलेक्शन केले. चेहरे चित्रपट देशातील 1000 स्क्रीन्स रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाला दिल्लीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे इतर राज्यात म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. विकेंडला कदाचित चित्रपटाला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
कोरोनाव्हायरसमुळे महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहे सध्या बंद आहे. तर काही राज्यात अटी- शर्तीसह चित्रपटगृहे सुरू करण्यात आली आहे. दिल्ली ५० टक्के आसन क्षमेतेसह चित्रपटगृहे सुरू करण्यात आली आहे. तर देशातील अनेक चित्रपटगृहे 15-20 टक्के आसन क्षमतेसह सुरू करण्यात आली आहे.
‘चेहरे’ चित्रपटाचे दिग्दर्शन रुमी जाफरी यांनी केले आहे. या चित्रपटात कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. अमिताभ आणि इम्रानसोबतच रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर देखील दिसणार आहेत. तसेच क्रिस्टल डीसूजासोबत रिया चक्रवर्ती देखील चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये कायम चर्चेचा विषय बनून राहिला होता. चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एक वरिष्ठ क्रिमिनल वकिलांची भूमिका केली आहे. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटासाठी एकही रूपया घेतलेला नाही.
चेहरे हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर हा चित्रपट 9 एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार परंतु दुसऱ्या लाट आल्यानंतर चित्रपटगृहे बंद करण्यात आली आणि पुन्हा प्रदर्शनाची तारीख 27 ऑगस्टला निश्चित केली.
संबंधित बातम्या :