Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Sanjay Mone : अमित ठाकरेंनी वेगात वाहन चालवून एकही गुन्हा केलेला नाही; 'राजपुत्रा'ला मत का द्याल? संजय मोनेंनी सांगितले महत्त्वाचे 10 मुद्दे


राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) पहिल्यांचा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. माहीमच्या मतदारसंघातून (Mahim Assembly Constituency) अमित ठाकरे यंदाच्या महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघाकडे लागून राहिलंय. अमित ठाकरेंसाठी राज ठाकरेंपासून संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आणि मनसे पक्षाचे कार्यकर्ते मैदानात आहेत. इतकच नव्हे तर कलाकार देखील अमित ठाकरेंसाठी प्रचाराच्या रिंगणात उतरल्याचं चित्र आहे. नुकतच अभिनेते संजय मोने (Sanjay Mone) यांनी देखील अमित ठाकरेंसाठी खास पोस्ट केली आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


Tharla Tar Mag : नात्याची नवी सुरुवात होणार, मधूभाऊंच्या येण्याने सायली-अर्जुनमधला दुरावा प्रेमाच्या मिठीने संपणार


 स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) ठरलं तर मग (Tharla Tar Mag) या मालिकेत वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये मधूभाऊंना अटक करण्यात आली होती. पण आता अखेर मधूभाऊंना जामीन मिळवून देण्यात अर्जुनला यश आलं आहे. मधूभाऊंच्या केसमुळे सायली आणि अर्जुन एकमेकांच्या जवळ आले होते. पण आता मधूभाऊंची केस अर्जुन लांबणीवर टाकत असल्याचा गैरसमज सायलीचा झाला होता. सायलीचा हा गैरसमज दूर करण्याचा अर्जुन बराच प्रयत्न करत होता. त्याच प्रयत्नांना यश मिळत कोर्टानेही मधूभाऊंचा जामीन मंजूर केला आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


Singham Again Worldwide BO Collection: सिंघमची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, रचलेत 4 धमाकेदार रेकॉर्ड, 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा अजयचा चौथा चित्रपट


दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांच्या सिंघम अगेननं (Singham Again) वर्ल्डवाईड नवा रेकॉर्ड रचला आहे. फिल्मनं वर्ल्डवाईड (Worldwide Collection) 300 कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. असं करणारा हा बॉलिवूडचा तिसरा चित्रपट बनला आहे. फिल्मनं दुसऱ्या विकेंडमध्ये नवा माइलस्टोन हिट केला आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


Marathi Actress : 'चंद्रकांत कुलकर्णीमुळेच इंडस्ट्रीत गटबाजी आली', ज्येष्ठ अभिनेत्रीचे गंभीर आरोप


 ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांनी सिनेसृष्टीतल्या अनेक मुद्द्यावर स्पष्ट भाष्य केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी डॉक्टर काशिनाथ घाणेकर सिनेमावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी दिवगंत अभिनेत्री रंजना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता मराठी सिनेसृष्टीमधले प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी (Chandrakant Kulkarni) यांच्यावरही सविता मालपेकरांनी गंभीर आरोप केलेत. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


Ankita Walavalkar: 'बिगबॉस' फेम सूरजचं वागणं झालं असह्य, अंकिता वालावलकर म्हणाली 'माझ्याकडून आता अपेक्षा नसाव्यात..


बिग बॉस मराठी च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेले सुरज चव्हाण आणि अंकिता प्रभू वालावलकर यांची केमिस्ट्री बिग बॉसच्या घरातून सर्वांच्या पसंतीस उतरली होती. पण आता या दोघांमध्ये नक्की काय बीनसलं अशा चर्चा सध्या होत आहेत. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर सुरजचा गावी बिग बॉसचे अनेक सदस्य गेले. नुकतेच अंकिता ही त्याच्या गावी जाऊन आल्याचं तिने सोशल मीडियावर टाकलं होतं. पण आता गावी गेल्यानंतर सुरजची वागणूक खटकल्याचे सांगत तिने युट्युब वर एक स्वतंत्र व्हिडिओच बनवला आहे. माझ्याकडून आता अपेक्षा नसाव्यात, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर असं शीर्षक देत सुरज विषयी तिनं नाराजी व्यक्त केली आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...