Bhaskar Jadhav on Sunil Kedar : सुनील केदार (Sunil Kedar) हे मारुतीच्या बेंबीतला विंचू आहेत, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी टीका केली. शिवसेना स्वतःच्या हिमतीवर गद्दारी करणाऱ्यांशी सामना करण्यास समर्थ असल्याक्षे जाधव म्हणाले. आमच्या उमेदवाराने गद्दारी केली म्हणून रामटेकमध्ये काँग्रेसने गद्दारी करुन उमेदवार देणे ही पण गद्दारीच असे म्हणत भास्कर जाधवांनी सुनील केदारांवर जोरदार हल्लाबोल केला.
रामटेक या जागेवर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे कारण, गद्दारी करुन आशिष जयस्वाल हे शिवसेना शिंदे गटात गेले होते. त्यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे भास्कर म्हणाले. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून गेम करणारी शिवसेना नाही. आम्ही 27 जागांवर तुम्हाला मदत करत आहोत. तुम्ही मात्र, आमच्या एका जेगावर गद्दारी करता असे म्हणत भास्कर जाधवांनी टीका केली. तुम्ही आम्हाला मदत करत नाहीत, तुम्ही आमच्याशी गद्दारी करत आहे. सुनील केदार हे मारुतीच्या बेंबीत बसलेला विंचू आहे.
राजेंद्र मुळक यांच्यावर कारवाई करावी
रामटेक विधानसभा मतदारसंघ (Ramtek Assembly Constituency) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सोडला होता. ठाकरेंच्या शिवसेनेने विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीकडून आमदार आशिष जयस्वाल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी या मतदारसंघात बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसची नैतिक जबाबदारी आहे. त्यांनी राजेंद्र मुळक यांच्यावर कारवाई करायला हवी. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीमागे इथल्या काँग्रेस नेत्याचा हात आहे, असा आरोप करत भास्कर जाधव यांनी सुनील केदार यांच्यावर टीका केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं
विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळ उडवला आहे. या काळात राजकीय नेते ऐकमेकांवर जहरी टीका करताना दिसत आहेत. तसेच काही नेते वादग्रस्त वक्तव्य देखील करताना दिसत आहे. यामुळं राजकीय वातावरण चांगलच पेटल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे.