Singham Again Worldwide BO Collection: दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांच्या सिंघम अगेननं (Singham Again) वर्ल्डवाईड नवा रेकॉर्ड रचला आहे. फिल्मनं वर्ल्डवाईड (Worldwide Collection) 300 कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. असं करणारा हा बॉलिवूडचा तिसरा चित्रपट बनला आहे. फिल्मनं दुसऱ्या विकेंडमध्ये नवा माइलस्टोन हिट केला आहे.
सिंघम अगेनचा बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, सिंघम अगेननं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 248 कोटींचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. तर ओव्हरसीज बॉक्स ऑफिसवर 65 कोटींचं कलेक्शन केलं आहे. या हिशोबानं फिल्मनं 313 कोटींचा बिजनेस केला आहे. फायटर आणि स्त्री 2 नंतर ही अचिव्हमेंट मिळवणारा सिंघम अगेन हा तिसरा चित्रपट आहे.
अशातच सिंघम अगेन अजय देवगण यांचा चौथा 300 कोटींची कमाई करणारा चित्रपट आहे. यापूर्वी तानाजी: द अनसंग वारियर, दृश्यम 2 आणि गोलमाल अगेननं 300 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली होती. याव्यतिरिक्त त्यांचा RRR देखील या लिस्टमध्ये सहभागी झाला आहे. पण, या फिल्ममध्ये अजय देवगण लीड रोलमध्ये नव्हता.
करिना-रोहितनंही रचलेत विक्रम
याव्यतिरिक्त सिंघम अगेन करिना कपूरची बजरंगी भाईजान, थ्री इडियट्स आणि गुड न्यूजनंतर 300 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेणारा चौथा चित्रपच आहे. रोहित शेट्टीसाठी, चेन्नई एक्सप्रेस, सिम्बा, दिलवाले आणि गोलमाल अगेननंतर 300 कोटी रुपयांच्या बॉक्स ऑफिस क्लबमध्ये प्रवेश करणारा हा पाचवा चित्रपट आहे.
सिंघम अगेनमध्ये झळकली ही स्टार कास्ट
अजय देवगण व्यतिरिक्त करीना कपूर खान 'सिंघम अगेन'मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. तिनं अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली होती. याशिवाय टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, अर्जुन कपूर, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. अर्जुन कपूरच्या भूमिकेला चाहत्यांकडून पसंती मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.