Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेले सुरज चव्हाण आणि अंकिता प्रभू वालावलकर यांची केमिस्ट्री बिग बॉसच्या घरातून सर्वांच्या पसंतीस उतरली होती. पण आता या दोघांमध्ये नक्की काय बीनसलं अशा चर्चा सध्या होत आहेत. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर सुरजचा गावी बिग बॉसचे अनेक सदस्य गेले. नुकतेच अंकिता ही त्याच्या गावी जाऊन आल्याचं तिने सोशल मीडियावर टाकलं होतं. पण आता गावी गेल्यानंतर सुरजची वागणूक खटकल्याचे सांगत तिने युट्युब वर एक स्वतंत्र व्हिडिओच बनवला आहे. माझ्याकडून आता अपेक्षा नसाव्यात, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर असं शीर्षक देत सुरज विषयी तिनं नाराजी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी सुरजच्या instagramvवरून अंकिताचे सर्व व्हिडिओ डिलीट केलेले दिसल्याने अंकिताच्या चाहत्यांनी सुरजला ट्रोल केल्याचं दिसलं. सुरज न इंस्टाग्राम वर एक स्टोरी शेअर करत तिची माफी ही मागितली होती. आता अंकिताने त्याच्या गावात जाऊन आल्यानंतर सुरजच्या प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न होतोय. हे आता सहन होत नाही असं म्हणत व्हिडिओ केला आहे.
काय म्हणाली या व्हिडिओमध्ये अंकिता?
व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओ बनवण्या मागचं कारण सांगत अंकिताने सुरज ला 70 दिवस ओळखत असून बिग बॉसच्या घरात ७० दिवसांचा आमचा प्रवास झाला आहे. सुरज अतिशय भोळा आहे. त्याला अनेक गोष्टी कळत नाही. त्याला नॉमिनेटही मी याच करण्याकरता करत होते की त्याला त्याचं मत मांडता येत नाही. याच गोष्टीचा त्याचा जो प्रॉब्लेम आहे आणि त्यातून त्यांनी मला अडकवण्याचा जो प्रयत्न केलाय तो आता सहन करण्याच्या पलीकडे झाला आहे.
सुरजच्या मनात या गोष्टी भरवण्यात आल्यात
सुरज विषयी राग ठेवू नका असं म्हणत त्याला जसं लोक सांगतात तसं तो वागत जातो. असं अंकिता म्हणाली. मला खात्री आहे त्याला आता हे कोणीतरी असंच सांगितलं असेल की अंकिताने तुझ्याविषयी वाईट काहीतरी फिरवलंय. मी ज्या कारणासाठी त्याला नॉमिनेट करायचं तेच आता समोर येत आहे. त्याला मत मांडता येत नाही हे तुम्हालाही कळलं असेल. काही गोष्टींमध्ये तो फसला जातोय तो फसला जाऊ नये असंच मला वाटतं. मी खूप शांत राहायचं ठरवलं पण त्याचा परिणाम उलटाच झाल्याचा दिसलं. असं अंकिता नया व्हिडिओत सांगितलं.