Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Sanjay Leela Bhansali : संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडीला पाकिस्तानातून प्रेम, म्हणाले, 'ही वेब सीरिज दोघांना जोडणारी एक दुवा'


संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची बहुप्रतिक्षित असलेली हिरामंडी:द डायमंड बाजार ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मागील अनेक दिवसांपासून या सीरिजची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजला जितकं भारतातून प्रेम मिळतंय, तितकंच सीमेपलीकडूनही प्रेम मिळत असल्याचं चित्र आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Myra Vaikul:  'कोणत्याही मुलाला जज करणं...', चिमुकल्या मायराच्या बोलण्यावरुन ट्रोलिंगची लाट, वडीलांनीही दिलं चोख उत्तर


अवघ्या सात वर्षांची चिमुकली असलेली मायरा वायकुळ (Myra Vaikul) हिने अल्पावधीच प्रेक्षकांची मनं जिंकली. छोट्या पडद्यावरुन भेटीला आलेली छोटी मायरा आता मोठा पडदाही गाजवतेय. 'नाच गं घुमा' (Naach G Ghuma) या सिनेमातून मायरा प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. या सिनेमाच्या निमित्ताने मायराने अनेक मुलाखती दिल्या. पण तिच्या मुलाखतीमधील तिची उत्तरं ही मात्र ट्रोलिंगचं कारण ठरलीत. पण हे ट्रोलिंग तिचं नाही झालं, तर या ट्रोलिंगला तिच्या आईवडिलांना सामोरं जावं लागलं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा



Prasad Oak : भाऊ वडिलांना अग्नी देत होता आणि हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून स्किट बघत होतो, प्रसाद ओकने सांगितला आयुष्यातला सगळ्यात अवघड प्रसंग


काही वर्षांपूर्वी जगभरात आलेल्या एका महामारीने सर्वसामान्यांपासून अनेकांची आयुष्य बदलून टाकलीत. या कठीण काळात अनेकांनी त्यांच्या जवळच्या माणसांना गमावलं. लाखो लोकं या महामारीत दगावलीत, अनेकांची कुटुंब पोरकी झालीत. संपूर्ण जगाने या महामारीचा काळ अनुभवला होता. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याने नुकतच याच काळातील त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात अवघड प्रसंगाविषयी भाष्य केलं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Raj Thackeray : पहिल्यांदा 'स्वदेस' पाहिला तेव्हा राज ठाकरेंची काय होती प्रतिक्रिया? आशुतोष गोवारीकरांना म्हणाले, 'हा काय सिनेमा....'


 गुढीपाडव्याच्या मनसे (MNS) मेळाव्यात राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर महाराष्ट्रभरातून त्यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उभे केले जाऊ लागले. बिनशर्त मोदी सरकारला पाठिंबा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्रात आता मनसे देखील भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पण त्यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा सेंटर पॉईंट ठरले. या सगळ्यावर राज ठाकरे यांनी बोल भिडू या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Raj Thackeray : 'देवेंद्र फडणवीसांना गाणं लिहिण्याची गरज आहेच', राज ठाकरेंची मिश्किल टीप्पणी 


राज ठाकरे (Raj Thackeray) हे त्यांच्या राजकीय भाषणामुळे आणि वक्तृत्वामुळे जितकं चर्चेत असतात, तितकच त्यांच्या कलेवरील प्रेमामुळेही राज ठाकरे चर्चेचा विषय ठरतात. राज ठाकरे यांचं सिनेमा, नाटक, संगीत हे प्रेम सगळ्यांनाच माहितेय. राज ठाकरे यांची राजकीय भूमिका सध्या अग्रस्थानी आहे. त्यातच त्यांची राजकीय शैलीतील टोलेबाजी राजकीय वर्तुळाला चांगलीच ज्ञात आहे. पण यावेळी राजकीय टोलेबाजी न करता राज ठाकरे यांनी गाण्याच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर मिश्किल टीप्पणी केली. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा