Prasad Oak : काही वर्षांपूर्वी जगभरात आलेल्या एका महामारीने सर्वसामान्यांपासून अनेकांची आयुष्य बदलून टाकलीत. या कठीण काळात अनेकांनी त्यांच्या जवळच्या माणसांना गमावलं. लाखो लोकं या महामारीत दगावलीत, अनेकांची कुटुंब पोरकी झालीत. संपूर्ण जगाने या महामारीचा काळ अनुभवला होता. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याने नुकतच याच काळातील त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात अवघड प्रसंगाविषयी भाष्य केलं आहे. 


कोविडच्या काळात प्रसादने त्याच्या वडिलांना गमावलं. पण त्यावेळी असलेल्या नियमांमुळे तो दमणमध्ये हास्यजत्रा कार्यक्रमाचं शुटींग करत होता. त्यामुळे त्याला त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारांच्या विधीला उपस्थित राहता आलं नाही. इतकच काय तर प्रसादला त्याच्या वडिलांना शेवटचं पाहताही आलं नाही. त्याच्या आयुष्यातला हाच सगळ्यात अवघड प्रसंग प्रसादने कॉकटेल स्टुडिओ’ ‘या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला आहे. 


'मला बायकोने फोन करुन सांगितलं की बाबा गेलेत'


प्रसादने सांगितलं की, कोविडची पहिला लाट येऊन गेली होती. थोडी त्याची झळ कमी झाल्यानंतर सरकारने थोड्या प्रमाणात शुटींग करण्याची परवानगी दिली होती.  नियमांनुसार हास्यजत्रेचं युनिट दमणमध्ये पोहचलं. 29 एप्रिलला दमणमध्ये पोहचलो. 30 तारखेला तिकडच्या शेड्युल्डचा पहिला एपिसोड सकाळी 9 वाजता होता. 6,7 ला उठलो फ्रेश झालो. त्यानंतर फोन पहिला तेव्हा बायकोचे 8,10 कॉल्स येऊन गेले होते. मी फोन केला आणि तिने सांगितलं की बाबा गेले. मी पुण्याचा असल्याने तिथले अनेक मित्र आहेत. एका मित्राच्या ओळखीने त्यावेळच्या मेडिकल ऑफिसरशी माझा संपर्क झाला. मी त्यांना सांगितलं माझे वडिल आहे. त्यांनी मला सांगितलं की, सर परिस्थिती खूप भीषण आहे. मला जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास ठेवायला परवानगी आहे. तुम्ही स्वत: मला फोन केला आहे, तर मी जास्तीत जास्त पंधरा मिनिटं, अर्धा तास ठेवू शकतो. पण तुम्ही आता दमणमध्ये आहात आणि ते पुण्यात आहेत. तुम्हाला इथे यायला कमीत कमी 6 ते 7 तास लागतील. एवढ्या वेळ आम्ही ठेवू शकत नाही. आमच्यावर खूप प्रेशर आहे आणि परिस्थिती खूप नाजूक आहे. त्यामुळे मी हेल्पलेस आहे. हे ऐकल्यानंतर जाण्याचा काहीच प्रश्न नव्हता. 


मी हास्यजत्रेच्या खूर्चीत बसून स्किट बघत होतो - प्रसाद ओक


सगळ्याचसाठी खूप बंधनं होती. म्हणून मी त्यांना विनंती केली, भाऊ व्हिडिओ कॉल लावेल मला फक्त एकदा त्यांना बघू दे. तेव्हा ते म्हणाले नाही सर इथे मोबाईल आणण्याची परवानगी नाही. तुमचे भाऊ पण सगळं बाहेर ठेवून आले आहेत. मी त्यांना म्हटलं की, तुमच्या फोनवरुन मला लावून फक्त एकदा बघू द्या. ते म्हणाले नाही, अशी आम्हाला परवानगी नाही. मी नाही करु शकत. त्यामुळे मी शेवटचं वडिलांना पाहिलच नाही. थोड्यावेळाने भाऊ वडिलांना अग्नी देत होता आणि तिकडे हास्यजत्रेच्या खूर्चीत बसून मी स्किट बघत होतो, कलाकार म्हणून त्याच्या आयुष्यातील सगळ्यात अवघड प्रसंग प्रसाद ओकने यावेळी सांगितला. 


ही बातमी वाचा : 


Prasad Oak : ''अशा प्रकाराला वेळीच ठेचलं पाहिजे...''अभिनेता प्रसाद ओकने व्यक्त केला संताप